Home Vidarbha वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कोलारा वनपरीक्षेत्र (वन्यजीव) कार्यालयावर सातारा व बामनगावचे नागरिक धडकले…...

वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कोलारा वनपरीक्षेत्र (वन्यजीव) कार्यालयावर सातारा व बामनगावचे नागरिक धडकले… — आरएफओ यांना दिले निवेदन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

       ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या लगत सातारा,बामणगाव या परिसरात वाघ व वन्य हिस्त्र प्राणी यांचा वाढता धुमाकूळ असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची गुरेढोरे ठार झाली असून शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.

                वाघाच्या दहशतिमुळे शेती व्यवसायाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.तेव्हा वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी दिनांक ३० सप्टेंबरला शेकडो महिला पुरुष कोलारा वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडकले असून आरएफओ वैद्य यांना चिमूर भाजप मंडल अध्यक्ष सरपंच गजानन गुळधे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

        सातारा,बामणगाव हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत गावे असून शेतकऱ्यांची शेती आहे.वाघ आणि अन्य वन्य हिस्त्र प्राण्यामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झालेली आहे.यामुळे शेती करणे कठीण झालेले आहे असून शेतीचे नुकसान होत आहे.

               शेतकऱ्यांची गुरेढोरे वाघाने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना नुकत्याच घडल्या.वाघ आणि वन्य हिस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करण्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

         निवेदन देत असताना सुरेश जांभुळे,मोरेश्वर शेडामे,प्रियंका बावणे,दिनेश कोडापे,मासळ सरपंच विकास धारणे,विकास भोयर यांच्या सह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.