अबोदनगो चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनीधी
दखल न्युज भारत
चिखलदरा :- २९/०९/२०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

तसेच एनसिडी अंतर्गत मधुमेह, हृदयरोग व कॅन्सर या आजारांचे स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण, सिकलसेल तपासणी तसेच गरोदर मतांच्या एएनसी प्रोफाइल करण्यात आल्या.आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील व उपकेंद्र स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिवसेनाचे मगलसिग धुर्वे शिवसेनेचे चिखलदरा अध्यक्ष निलेश मालवीय पियुष मालवीय गावातील उपसरपंचा वैशाली राठोड सचिव मडम तसेच काटकुभ येथील वैघकिय अधिकारी मडम वैघकिय अधिकारी डॉ. वैभव रामटेके हे उपस्थित होते.
तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांचा सत्कार करण्यात आला.




