Home Social सावलीत माँ शारदा व माँ दुर्गा मातेच्या दर्शनाने भक्तिभावाची उधळण… —...

सावलीत माँ शारदा व माँ दुर्गा मातेच्या दर्शनाने भक्तिभावाची उधळण… — माजी खासदार डॉ.अशोकजी नेते यांची मनोभावे पूजा-अर्चा…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

ता.सावली, जि.चंद्रपूर दि. २९ सप्टेंबर २०२५

             नवरात्री उत्सवाच्या पावन पर्वावर सावली शहरात भक्तिभाव, उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण अनुभवायला मिळाले. या धार्मिक भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांनी सावली शहरातील विविध मंडळांमध्ये स्थापित माँ शारदा व माँ दुर्गा मातेचे दर्शन घेत मनोभावे पूजा-अर्चा व आरती केली. देवीसमोर समाजहित, जनकल्याण व विकासासाठी त्यांनी प्रार्थना केली.

विविध मंडळांना सदिच्छा भेट…

          या प्रसंगी माँ शक्ती शारदा उत्सव मंडळ, वार्ड नं. १२ कवठी रोड, सावली, श्री विठ्ठल रुक्माई दुर्गा उत्सव मंडळ, सावली, मार्कंडेय सार्वजनिक शारदा महिला मंडळ, सावली, नवरंग शारदा उत्सव मंडळ, वार्ड नं. १२ व १३, सावली, माता राणी सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ, सावली, श्री गणेश शारदा उत्सव मंडळ, वाल्मिकी चौक, सावली, परमेश्वरी सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ, वार्ड नं. १, सावली अशा विविध मंडळांना भेट देऊन त्यांनी दर्शन घेतले.

            मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ अर्पण करून खा.डॉ. नेते यांचा मान-सन्मान केला. यावेळी त्यांनी सावलीतील जनतेस नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

            यावेळी खा. डॉ. नेते यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय रोहित भाऊ बोम्मावार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच त्यांनी वाल्मीकि अभ्यासिका ला भेट देत तरुणांना शुभेच्छा दिल्या व “मी आपल्या सोबत आहे” असा विश्वास व्यक्त करत अभ्यासिकेची पाहणी केली.

         या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रोहित भाऊ बोम्मावार, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री निलम सुरमवार, भाजपा युवा नेते राकेश विरमलवार, भाजप युवा नेते राहुल लोड़्डेलीवार, माजी सभापती कृष्णा भाऊ राऊत, सामाजिक नेते गुलाब गेडाम, प्यारमवार सर, सोशल मीडिया प्रमुख आनंद खजांजी, सोशल मीडियाचे प्रमुख राकेश कोंडबत्तुलवार, रोहीत बोम्मावार, सुदर्शन चाम्मर्लावार, गणेश नागुलवार, पंकज सिद्देकींवार, अजय ताटकोंडावार, कपिल लोड़्डेलीवार, बन्सोड सर यांच्यासह सावली शहरातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, बंधू-भगिनी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             नवरात्री उत्सवात खा.डॉ.नेते यांच्या उपस्थितीमुळे सावलीत श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचे वातावरण अधिकच बळकट झाले.