Home उपक्रम छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे एक पेड माँ के नाम,स्वच्छता...

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे एक पेड माँ के नाम,स्वच्छता ही सेवा अभियान… 

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

           छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच रासेयो विभाग सं.गा.बा.अम.विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त पाचव्या दिवशी जागतिक पर्यावरण दिवसा निमित्य एक पेड माँ के नाम तसेच स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न झाले.

          प्राचार्य डॉ.रविंद्र इचे यांनी सांगितले की,निसर्गाचा समतोल सांभाळणे आपल्या हाती आहे,सतत ढगफुटी होत आहे. त्याकरिता वृक्षरोपण करणे वृक्षाचे संवर्धन करणे खूप आवश्यक आहे.वातावरणात सतत बदल होत आहे वृक्षतोड थांबवावी असे प्रतिपादन केले.

          रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी सांगितले की पर्यावरणाचे संरक्षण केल्याशिवाय अस्तित्व सुरक्षित नाही प्रदूषण कमी करणे, पाणी व ऊर्जेची बचत करणे, नैसर्गिक साधन संपत्ती जपणे आवश्यक आहे. त्याकरिता वृक्षारोपण करणे त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.रासेयो स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

           रासेयो स्वयंसेवकांनी एक दिन, एक घंटा, एक साथ गाजर गवत निर्मूलन तसेच परिसरातील प्लास्टिक गोळा केले रस्त्याची स्वच्छता करण्यात आली पालापाचोळा गोळा केला. महाविद्यालयामध्ये सोनचाफा बकुळी, सायफन कडुलिंब इ. वृक्षारोपण करण्यात आले.

         एक पेड माँ के नाम व स्वच्छता ही सेवा या अभियानाला डॉ.प्रविण सदार, शिक्षकेत्तर कर्मचारी रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.