युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर शहरातील बनोसा येथिल ईदगा कब्रस्तान परिसरात दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमात कब्रस्तान परिसराची पाहणी करून विविध ठिकाणी झाडे लावण्यात आली. पर्यावरण संवर्धनाबरोबरच कब्रस्तान परिसर हिरवागार ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमावेळी उपस्थित नागरिकांनी कब्रस्तान परिसरात गेल्या काही दिवसांत चोऱ्यांच्या घटना वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर कब्रस्तान परिसराला सुरक्षिततेसाठी मजबूत वॉल कंपाऊंड उभारण्याची मागणी करण्यात आली. कब्रस्तानच्या संरक्षणासाठी ही मागणी तातडीने मान्य करून काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रसंगी दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिश शिरभाते, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ईश्वर बुंदेले, ईदगा कब्रस्तानचे अध्यक्ष मो. ईद्रीस शेख, युसुफ अ. कयूम, डॉ.वसिम, डॉ.युनूस, हाफिज अफरोज, इसामुद्दीन भाई, माजी नगरसेवक अस्लम भाई घानिवाले, मा. नगरसेवक रामेश्वर तांडेकर, सलीम शोएब , मुमताज देशमुख, गोलू टापरे, वहीद भाई, मौलि सपान, जाकिरभाई अकोट आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त कब्रस्तान परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक ऐक्याचे दर्शन या वृक्षारोपण उपक्रमातून घडले.



