Home Social साकोली रक्तदान शिबिरात १२६ जणांचे स्वेच्छेने रक्तदान… — स्व.गिताताई कापगते स्मृती...

साकोली रक्तदान शिबिरात १२६ जणांचे स्वेच्छेने रक्तदान… — स्व.गिताताई कापगते स्मृती प्रित्यर्थ सलग पाचवे पुण्यस्मरणाचे आयोजन…

निलय झोडे 

 उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

साकोली : महिला सशक्तीकरणांची रणरागिणी स्व. गिताताई कापगते स्मृती प्रित्यर्थ साकोलीत (रवि. २८ सप्टें.) ला आयोजित रक्तदान शिबिरात १२६ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. येथे परीसरात वृक्षारोपण व दिव्यांगांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता. सदर आयोजन इंजि. सपन कापगते व मित्र परिवार साकोली सेंदूरवाफा यांनी केले होते. 

              आपल्या प्रेमळ स्वभावामुळे प्रत्येक महिलांची आदर्श व झाशीची राणी म्हणून अभिनयात ओळख असलेल्या, महिला सशक्तीकरणांची रणरागिणी स्व. गिताताई कापगते यांच्या ५ व्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर वृक्षारोपण व दिव्यांगांचा सत्कार कार्यक्रमात अतिथी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी आ. राजेश काशिवार, डॉ. प्रविण हांडेकर, जि. प. स. माहेश्वरी नेवारे, वनिता डोये, प्रा. गिता बोरकर, डॉ. अतुल दोनोडे, डॉ. नरेश कापगते, वेणूधर शेंडे, गुलाब कापगते, राधेश्याम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, शरद कापगते, नितीन खेडीकर, किशोर पोगडे, प्रभाकर सपाटे, प्रदीप गोमासे, लता द्रुगकर, रवि परशुरामकर, धनवंता राऊत, वैयजंती कापगते, शंकर हातझाडे, लखन बर्वे, मिना लांजेवार यांसह अन्य हजर होते.

        येथे रक्तदान शिबिरात १२६ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून स्व. गिताताईंना हिच श्रध्दांजली वाहिली. परीसरात विविध वृक्षांची लागवड करताना आली. तर अपंग व्यक्ती की जे दिव्यांग असूनही सामाजिक कार्यात आजही कर्तव्यदक्ष म्हणून सेवा देत आहेत अश्यांचा येथे सत्कार करण्यात आला. येथे समर्पण रक्तपेढी भंडाराचे डॉ. श्री नखाते, नचिकेत नखाते, पोर्णिमा मेश्राम, आचल लांजेवार यांनी आरोग्य सेवा दिली. या शिबिरात संचालन ॲड. मनिष कापगते यांनी केले. 

            रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व दिव्यांगांचा सत्कार समारोह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि. सपन कापगते व मित्र परिवारातील प्रितम कापगते, कुणाल देशमुख, जगन उईके, व्यंकट येवले, प्रा. अमोल हलमारे, गोलू धुर्वे, मोहिनी हांडेकर, अंशिका कापगते, देवश्री कापगते, कल्पना कापगते, प्रिती डोंगरवार, सागर पुस्तोडे, नयन राऊत, कुंदन वल्के, आशिष भिवगडे, भाविक लांजेवार, भिमा गहाणे, चंदू कापगते, शैलेश गोबाडे, विशाल कापगते, आशिष चेडगे, तुषार कापगते, पुष्कर करंजेकर, विजय दूबे, अमित हातझाडे, निशांत लांजेवार, विवेक बैरागी, संकेत तिडके आदींनी परिश्रम घेतले.