दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
विजयादशमी दिनानिमित्त होणाऱ्या आर.एस.एस.च्या कार्यक्रमला माजी राज्यपाल तथा आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते स्व.रा.सु.गवई यांच्या पत्नी व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई,तथा रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई यांच्या मातोश्री या जाणार असल्याचे एका बातमी द्वारे प्रसिध्द करण्यात आले होते.
या बातमीचे तिव्र पडसाद महाराष्ट्र राज्यातील अख्या आंबेडकरी जनतेमध्ये उमटू लागले होते.याची तात्काळ दखल घेत कमलताई गवई यांनी स्वहस्ताक्षराचे पत्र प्रसिध्द करुन दिनांक ५ आक्टोंबरला होणाऱ्या आर.एस.एस.च्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट ची संस्थापक अध्यक्षा म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आहे व देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे अमरावती येथील आर.एस.एस.च्या आगामी कार्यक्रमाला कदापिही हजर होणार नाही असे कमलताई गवई यांनी स्पष्ट केले.
तद्वतच सर्व भारतातील जनतेच्या जाणिवेला कुठल्याही प्रकारचे दुःख होवू देणार नाही,महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व देशातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असेही आवाहन कमलताई गवई यांनी जनतेला केले आहे.
याचबरोबर त्यांनी पत्रात म्हटले आहे की,विजयादशमी ही सहिन्दु संस्कृती असली तरी आम्हांकरिता धम्मच महत्त्वपूर्ण “आहे आणि धम्मचक्र परिवर्तन दिवस महत्वाचा आहे.यामुळे अपप्रचाराला किंवा अपप्रचार करणाऱ्या बातमीला बळी पडून नये.
तद्वतच त्यांनी प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीच्या निषेध व धिक्कार केला आहे.याचबरोबर तमाम माझ्या आंबेडकरी जनतेनी याची दखल घेवून माझेवर विश्वास ठेवावे असे आवाहन सुध्दा केले आहे.
मला विश्वासात न घेता किवा माझा लेखी होकार न घेता आरएसएसने सदरहून संभ्रम निर्माण केला आहे,हे एक त्यांचे षड्यंत्र आहे असेही त्या प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हणाल्या आहेत.



