Home Political राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक चिमुर तालुका मिडिया प्रमुख पदी शुभम गजभिये यांची...

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक चिमुर तालुका मिडिया प्रमुख पदी शुभम गजभिये यांची नियुक्ती…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

         चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील रहिवासी असलेले युवा पत्रकार शुभम विजय गजभिये यांची चिमूर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या मिडीयाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

         चिमूर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या मिडिया प्रमुख पदाची नियुक्ती चिमूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे यांनी केली आहे.

            शुमभ गजभिये यांना नियुक्तीचे पत्र देताना तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भोई समाज सेलचे चंद्रपूर जिल्हा संघटक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे चिमूर तालुका संघटक (उपसंपादक पब्लिक पंचनामा) श्री.विलास मोहीनकर,चिमूर शहर मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे चिमूर तालुका सहसंघटक उपक्षम रामटेके (मुख्य कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत),शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अविनाश अगडे,युवा पदाधिकारी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अक्षय लांजेवार हे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.