Home Social मराठवाड्याला माऊलींच्या आळंदीतून मदतीचा हात…

मराठवाड्याला माऊलींच्या आळंदीतून मदतीचा हात…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना आळंदीकरांनी पुढाकार घेत मानवतेचे उदाहरण घालून दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या संकटग्रस्त भागाला हातभार लावावा या उद्देशाने शहरातील नागरिक, विविध संस्था तसेच वारकरी भाविकांनी एकत्रित येत मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य गोळा केले.

           या मदत साहित्यामध्ये धान्य, पिण्याचे पाणी, कपडे, चादरी, औषधे, तसेच जीवनावश्यक सामान यांचा समावेश असून, गोळा झालेले साहित्य लवकरच रवाना करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत आणखी मदतसाहित्य पाठविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

        आळंदी स्थानिक ग्रामस्थ, गणेश मंडळे तसेच सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच सर्व सामान्य नागरिकांनी देखील उदंड प्रतिसाद देत मदतीचे हात पुढे केले आहेत.

          “वारकरी परंपरेत दीनदुबळ्यांना मदत करणे हीच खरी सेवा मानली जाते. मराठवाड्यातील संकटग्रस्त भावंडांसाठी आळंदीकर सदैव तत्पर राहतील,” असे आळंदीकरांनी सांगितले. या उपक्रमामुळे आळंदी शहराने पुन्हा एकदा समाजाभिमुखतेचा आदर्श निर्माण केला असून मराठवाड्यातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.