Home सांस्कृतिक मेघ राजाच्या संकटातून माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे.तुळजा भवानी माते...

मेघ राजाच्या संकटातून माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे.तुळजा भवानी माते चरणी सारिका भरणे यांचे साकडे…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

 पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवा निमित्त सारिकामामी भरणे यांनी नतमस्तक होऊन दर्शन व आशीर्वाद घेतला.

         यावेळी सारिका मामी भरणे यांचा सन्मान पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने माजी संचालिका सुभद्रबाई बोडके यांच्य हस्ते करण्यात आला.

       याप्रसंगी सारिका मामी भरणे बोलत आसताना म्हणाल्या की आई तुळजा भवानी मातेचा व इंदापूर तालुक्याच्या तमाम जनतेचा आशीर्वाद मामांच्या पाठीमागे खंबीरपणे आसल्यामुळेच मामा जिल्हा बँक संचालक, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, पासून आमदार ते मंत्रिपद ते कृषी मंत्री झाले.

            पिंपरी बुद्रुक गाव नेहमीच मामाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. याबद्दल आमचे भरणे परिवार कधीच विसर पडू देणार नाही. मामांना राज्याच्या कृषिमंत्री पदाची मोठी जबाबदारी मिळाल्याने संपूर्ण राज्यामध्ये फिरावे लागते आहे. म्हणूनच मी व श्रीराज, आम्ही दोघे मामांच्या वतीने प्रत्येकाच्या सुखा दुःखात व इतर सर्वच कार्य. क्रमांमध्ये सामील होणारच आहे,, सारिका मामी भरणे यांचे पिंपरी बुद्रुक येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनाप्रसंगी उद्गार. 

         नवरात्र उत्सवा निमित्त जागृत देवस्थान तुळजाभवानी मातेला साडी, चोळी, ओटी व नारळाचे तोरण अर्पण करून पूजा व आरती केल्यानंतर पुढे बोलत असताना सारिका मामी भरणे म्हणाल्या की,आवकाळी पावसामुळे शेतकरी राजा सुखी राहू दे. येणारे संकट दूर होऊन सुखी समाधानी राहुदे तुळजाभवानी माते चरणी सारिका मामी भरणे यांनी प्रार्थना केली .

         यावेळी प्रमुख उपस्थिती साखर कारखान्याचे माजी संचालिका सुभद्राबाई महादेव बोडके, संचालक व आदर्श सरपंच श्रीकांत बोडके, शांताबाई पारसे, सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, माजी सदस्य समाधान बोडके सह आजी माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सह सर्व पिंपरी बुद्रुक ग्रामस्थ उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक श्रीकांत बोडके यांनी मानले, तर सूत्रसंचालन महेश सुतारे यांनी केले.