युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे रासेयो संचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच रासेयो विभाग सं.गा.बा.अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या पंधरवड्यानिमित्त चौथ्या दिवशी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धा महाविद्यालयांमध्ये संपन्न झाली.
डॉ.भारत कल्याणकर यांनी निबंध स्पर्धेला मार्गदर्शन करताना सांगितले की,पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी देशाच्या सबलीकरणासाठी एकात्म मानववाद या नावाने मांडलेल्या तत्त्वज्ञानाला नुकतेच साठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
अर्थात एकात्मक मानवाचे हे हिरकमहोत्सवी वर्ष आहे यांचे औचित्य साधून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एकात्मक मानववाद भारताच्या सशक्तिकरणाचे तत्वज्ञान एकात्म हा शब्द खूप उंचीचा आहे तो उदात्त आहे.
एकात्मक भाव म्हणजे एक्य समरस तादात्म पावणारी अनुभूती जीव आणि जगताबद्दल या जगात माणूस समाज आणि निसर्ग हे तिन्ही घटक एका सूत्रात बांधले गेलेले आहेत माणूस आणि समाज समाज आणि निसर्ग एकमेकांशी परस्परा अनुकूल नि परस्पर पूरक असतात त्यांच्यात एक संगता राखणारे असे एकात्मक अंतर : सूत्र असते असे प्रतिपादन केले.
निबंध स्पर्धेचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले.निबंध स्पर्धेकरिता रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.तसेच निबंध स्पर्धा करिता प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



