Home Maharashtra महर्षी वेदव्यास गुरुकुलाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…

महर्षी वेदव्यास गुरुकुलाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

पुणे – मोशी येथील महर्षी वेदव्यास गुरुकुलला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी भेट दिली.या भेटीदरम्यान गुरुकुलातील विद्या, संस्कृती आणि सामाजिक कार्य याबाबत सविस्तर माहिती घेतली.

         यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, खा.श्रीरंग बारणे, स्वामी विठ्ठलानंद गिरी, शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण, संतोष बारणे,‌ विनायक घिगे, नितीन ननवरे, वेदश्री तपोवनचे अध्यापक, विद्यार्थी, होते.

        उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुकुलातील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचे विकासकार्य, तसेच संस्कृती संवर्धनासाठी चालवले जाणारे कार्यक्रम पाहिले आणि शिक्षक व विद्यार्थी यांशी संवाद साधला. त्यांनी गुरुकुलाच्या कार्याबाबत आपल्या मनोगतात संत समाजातील शिक्षण व संस्कृती जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.

         या भेटीत प्रभू श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गुरुवर्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे आशीर्वाद देखील घेतले. गुरुवर्य महाराजांनी गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्कृती संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

        गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी चालवले जाणारे शैक्षणिक व आध्यात्मिक कार्यक्रम, योग आणि वैदिक शिक्षण, तसेच सामाजिक उपक्रम या सर्वांचा उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यांनी गुरुकुलाच्या भविष्यातील योजनांबाबत मार्गदर्शन दिले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.

         या भेटीमुळे गुरुकुलातील शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली असून, भविष्यकालीन शैक्षणिक व संस्कृती संवर्धनाच्या उपक्रमांसाठी नवा उत्साह निर्माण झाला आहे.