दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामकाजात महत्त्वाचा टप्पा गाठत पुणे जिल्हा भाजपा सचिवपदी किरण येळवंडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी ही निवड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
किरण येळवंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये कार्यरत असून आळंदी भाजपाचे ते शहराध्यक्ष होते.त्यांनी स्थानिक तसेच जिल्हास्तरावरील विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सामाजिक कार्याची जाण, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध या गुणांमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले आहे.

या निवडीबद्दल कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पक्षाच्या बळकटीसाठी येळवंडे निश्चितच प्रभावीपणे योगदान देतील, असा विश्वास भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.राम गावडे यांनी व्यक्त केला आहे.
“पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे आवाज उठवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन असे नवनिर्वाचित पुणे भाजपा सचिव किरण येळवंडे यांनी सांगितले.



