कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी : – एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय पारशिवनी तर्फे पोषण आहार सप्ताह अंर्तगत तालुका तील काद्री येथील साधनाताई आमटे अंगणवाडी क्रमांक १५८ येथे आज २५ सेप्टेंबर गुरुवार रोजी पोषण अभियान जन आंदोलन अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता वामन देशमुख, तालुका प्रकल्प अधिकारी पारशिवनी किशोर खेडकर, पर्यवेक्षिका अश्विनी ऊईके, कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा शहाणे, अंगणवाडी सेविका शशीकला बागडे सह मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
मान्यवरांनी पोषण आहार बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुलांमधील आणि महिलांमधील कुपोषण कमी करणे , गर्भवती आणि स्तनदा मातांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी प्रयत्न करणे , स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांमधून पौष्टिक आहार कसा मिळवावा , याबद्दल जागरूकता निर्माण करणे , सकस आहार , निरोगी खाण्याच्या सवयी आणि आरोग्य विषयक पद्धतींना प्रोत्साहन देणे अशी या कार्यक्रमाची उदिष्टे होती.
अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना व महिलांना पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि ते कसे मिळवावे, हे समजावून सांगितले. ०-६ वर्षांची मुले, गर्भवती आणि स्तनदा माता यांना आवश्यक असलेले कॅलरीज आणि प्रथिने देणारा पूरक पोषण आहार पुरवला जातो. असे मत पर्यवेक्षिका अश्विनी उईके यांनी आपल्या संबोधनातुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिसरात षोषण जागरूकता रैली काढुन नागरिकांना पोषण आणि आरोग्याचे महत्व पटवुन सांगितले. कार्यक्रमात पोषण आहार प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा वासनिक आणि आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका मिना पोटभरे यांनी केले.
या प्रसंगी सेविका रेखा मस्के , मंगला कामडे , शोभा सरोदे , लक्ष्मी देशमुख , सुनिता मारबते , प्रभा कारामोरे , पुष्पलता राऊत , सविता बावनकुळे , सुलताना बानो , सुमित्रा वैध , प्रतिषा सुकदेवे , प्रतिभा डोरले , सत्यफुला आष्टनकर सह आदि सेविका , मदतनीस , आशा वर्कर , गरोदर माता ,स्तनदा माता प्रामुख्याने उपस्थित होते .



