कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान :- नागपुर कविवर्य सुरेश भट्ट सभागृह येथे जिल्हा शालेय सिलंबम स्पर्धेत धर्मराज शाळेच्या व शिवशंभु आखाड्यांचा खेळाडुंनी गोल्ड मेडल, ब्राॅझ मेडल व सिल्वर मेडल पटकावुन जिल्ह्यात कन्हान, कांद्री , टेकाडीचे खेडाळूनी नाव रोशन केल्याने नागरिकांन कडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मंगळवार (दि.२३) सप्टेंबर रोजी नागपुर कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात जिल्हा शालेय सिलंबम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत धर्मराज शाळेच्या व शिवशंभु आखाड्यांचा खेळाडुंनी मुख्याध्यापक प्रकाश डुकरे, उपमुख्याध्यापक मोहन भेलकर, कोच अनिकेत निमजे यांचा मार्गदर्शनात सहभाग घेतला.
९ खेळाडुंनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन विरोधी खेळाडुला पराभुत करुन ७ गोल्ड मेडल, १ ब्राॅझ मेडल व १ सिल्वर मेडल पटकावुन घवघवीत यश मिळवला. खेळाडु कन्हान परिसरात दाखल होताच नागरिकांन कडुन फटाक्यांची आतिषबाजी करुन आणि मिठाई घालुन खेळाडुंचे अभिनंदन केले.
या मध्ये शिक्षक पीटीआय उदयचंद्र भस्मे, विजय पारधी सर, हरीश केवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी इंद्रपाल वंजारी, संदीप मेश्राम, हर्षल कोसरे , नैतिक कुंभलकर , आदित्य मांढरे प्रामुख्याने उपस्थित होते.



