माणूस जन्माला आल्यानंतर शिकून सवरून शहाना होतो,तो आपली कौटोंबिक जबाबदारी पार पाडतो, कमाई करतो,म्हातारा होतो आणि शेवटी आपली जीवन यात्रा संपवितो.काही अधांतरीच मारतात.
माणूस महिन्यातील 30 दिवस,वर्षाचे 12 महिने आणि आयुष्यातील सारीच वर्ष अहोरात्र झटतो, मर मर मरतो,सारे आयुष्य कुटुंबासाठी खर्च करतो,परंतु स्वतःचा आणि समाजाचा विचारच करीत नाही.स्वतःचा थोडा विचार करील पण समाजाचा तर मुळीच विचार करीत नाही.समाज म्हणजे जात किंवा धर्म नव्हे,तर समाज म्हणजे देश,देश म्हणजे राष्ट्र,राष्ट्र म्हणजे देशातील आम जनता.
माणूस कष्ट करतो,मेहनत करतो,कुणी अंग मेहनत करीत असतील ,तर कुणी बौद्धिक श्रम करीत असतील,परंतु सारेच जण काहीना काही काम करून पैसे कमावतात,शेतकरी शेत करतो,मजूर कष्ट करतो,घाम गाळतो,व्यापारी व्यापार करतो,शिक्षक मुलांना शिकवतो,कर्मचारी कार्यालयीन कामे करतात,कुणी हॉटेल,ड्रायव्हिंग, सफाई,इत्यादी कामे करतात आणि कुटुंब पोसतात,घर बांधतात,मुलांना शिक्षण देतात,दवाखान्याचा खर्च करतात,काही मोजके लोक तर एव्हढा पैसा कमावतात की,ते रिक्षा,बस नी प्रवास करीत नाहीत,तर स्वतःची AC car, हेली कॉप्टर,विमान असते,त्याने प्रवास करतात.सुख त्यांचे पायाशी लोळण घेते,सारे आयुष्य चैनीच्या वस्तू खरेदी करणे,आणि त्याचा उपभोग घेणे यातच ते आपली जिंदगी समाप्त करतात,अर्थात एव्हढा पैसा म्हणजे गरजेपेक्षा जास्त पैसा ज्यांच्याकडे येतो,तो पापाचा असतो,मेहनतीचा नसतो,तर कर्मचारी आणि मजूर यांच्या मेहनतीतून निर्माण झालेला तो पैसा ,संपती असते,भरमसाठ नफा,व्याज,काळाबाजार,साठेबाजी,नफेखोरी,तर कुणाचा नशिले पदार्थ बनून ते विकणे,जुगार,मटका,गुटका व्यभिचार,भ्रष्टाचार इत्यादी कामगारांनी जमलेल्या पैशातून श्रीमंतांची शान चालते.
याचा अर्थ देशातील 50 टक्के जनता कष्ट करून हालाकीचे जीवन जगते,तर 30 टक्के जनता बौद्धिक कष्ट करून जीवन जगते,तर 20 टक्के श्रीमंत हे शोषण पिळवणूक करून चैनीचे ऐश जीवन जगतात.पण कुणीही कसेही कमविले ,कितीही कमविले तरी,हे सारे वैभव मरताना सोबत घेऊन जात नाहीत,तर इथेच ठेऊन जातात.यात सारेच जण कुटुंबासाठी जगतात,पण स्वतःसाठी कमी,आणि देश राष्ट्र समाज यासाठी कुणीच जगत नाही.
थोडे स्वतःसाठी पण जगले पाहिजे,स्वतःच्या आवडी निवडी, स्वतःचे विचार,स्वतःच्या क्षमता,कौशल्य,सुप्तगुण याचा सर्वांनाच विसर पडतो.खरे तर ते केल्या शिवाय जीवनात खरा आनंद समाधान शांती मिळत नाही.परंतु यासाठी कुणाकडेच वेळ नसतो,कुणी गात नाही,कुणी नाचत नाहीत,कुणी चित्र,शिल्प आकारत नाहीत.आणि निर्मितीत जो आनंद असतो,तो कुठेच मिळत नाही.आपल्यातील सुप्त गुणांचा आविष्कार आदिवासी करतात,आणि त्याचा आनंद घेतात,पण बाकी कोणताही समाज हा आनंद घेत नाही,यालाच स्वतःसाठी जगणे म्हणतात,मित्रांना,नातेवाईकांना भेटणे,त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे,त्यांच्यासोबत सहलीला जाणे,देश पर्यटन करणे यातून सुद्धा आनंद घेता येतो.
माणूस हा जनावर नाही,तो बुद्धिशील आहे,तो बुद्धीच्या आधारे काहीपण करू शकतो,शिवाय तो समाजशील आहे,म्हणजेच man is a social being.म्हणजे समाज सोडून एकटा राहू शकत नाही,त्याला पत्नी,मुले,भाऊ ,बहिणी,नातेवाईक हवेत,कुटुंब हवे,मित्र हवेत.गाव आणि गावकरी हवेत,या शिवाय तो राहिला तर रानटी प्राणीच बनेल.
याचा अर्थ माणूस समाजशील प्राणी आहे.समाजाशिवाय राहूच शकत नाही,शेतात,कारखान्यात,कंपनीत,कार्यालयात,सगळीकडेच कामे करण्यासाठी माणसांची गरज पडते,एकत्र येण्यातूनच अनेक शोध लागतात,अनेक समस्या सुटतात,शेतीतील वस्तू,कारखान्यातील वस्तू निर्माण होतात.
हे जगच माणसाने निर्मिले आणि नटविले आहे.याचा अर्थ एकत्र आल्या शिवाय इथे काहीच होत नाही,आणि काहीच घडत नाही.शिवाय एकमेकांना अडीअडचणीत मदत होते.थोडक्यात निर्मिती,सहकार्य,यासाठी समाज हवा.
असे असताना आपल्या सोबत इतरांना घेऊन चालणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते.आपल्या देशात गरीबी आहे,त्यामुळे माणसे कुपोषित होऊन मारतात,कित्येकांना घरे नाहीत,कित्येक जमाती अजूनही भटकतच आहेत,त्यांना घर,गाव,राशन कार्ड,आधारकार्ड,मतदान कार्ड नाही,लाखो लोक सहामाहीने कामासाठी आईवडील,घरदार,जनावरे इतरांच्या भरवशावर सोडून कामासाठी स्थलांतरित होतात,कित्येक व्यसन करून मारतात,कित्येक मटका,जुगार, पत्ते खेळून बरबाद झाले.सारे लोक जाती धर्माच्या लढाया करून दरवर्षी मरतात.
अजूनही काही जमातीच्या मुलांना शाळा नाही, ज्यांना आहे आणि जेव्हढे प्राथमिक शाळेत जातात तेव्हढे कॉलेज शिक्षण करू शकत नाहीत,गरिबीमुळे.कित्येक जण औषधी विकत घेऊ शकत नाहीत,डॉक्टर फी देऊ शकत नाहीत.सरकारी दवाखाने,शाळा,वाहतूक निकृष्ट दर्जाची आहे. मुले शिकून बेकार आहेत.
या साऱ्या समस्या समाजाच्या म्हणजेच देशाच्या आशेत,यासाठी आपण आपला वेळ देणे,समाजकार्य,समाज परिवर्तन,समाजसेवा,म्हणजेच देशसेवा,जनसेवा हीच ईश्वर सेवा,असे समजून आपण आपल्या आयुष्यातील काही वेळ,म्हणजेच महिन्यातील 5 दिवस,वर्षातील 60 दिवस समाजकार्यासाठी देणे हे एक नागरिक,एक समाजशील माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे. ती पार पाडल्या शिवाय समाज सुधारणार नाही,म्हणजेच देश सुधारणार नाही.
देश सुधारणे,देशाची भौतिक प्रगती करणे हे सरकारचे काम आहे,आणि समाज परिवर्तन हे प्रत्येकाचे काम आहे.
थोडक्यात,व्यक्तिगत जबाबदारी,कौटोंबिक जबाबदारी आणि समाजाची जबाबदारी म्हणजे समाजकार्य,या मुख्य तीन जबाबदाऱ्या प्रत्येकांनी पार पाडल्या पाहिजेत.हे आपले कर्तव्यच होय.



