शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
सोयाबीन पिकावर yellow mozaic विषाणूजण्य रोगामुळे व अतिवृष्टीमुळे पिक पूर्णतः नष्ट झाल्याने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोक उईके यांना भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांद्वारे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर अचानक yellow mozaic विषाणूजण्य रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने आणि सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे सावरी परिसरातील सावरी -माकोना -खानगाव -गुजगव्हान-बोथली-खापरी-भिवकुंड अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक उध्वस्त झाले आहे.
या रोगामुळे एकाच वेळी संपूर्ण शेतातील पिक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी असलेला घास हिसकावून घेतला जात असून,शेतकरी हवालदिल झालेला आहे.
त्यामुळे सदर रोगामुळे झालेल्या नुकसानीचे शासनामार्फत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली आहे.
भाजपा युवा नेते प्रणय कारेकार सह,उपसरपंच प्रशांत काथवटे,निखिल डोईजड,अर्जुन पाटील थुटे,राजेंद्र राईकवार,अशोक जामुनकर,संदिप निखाडे,कैलास वाकडे,अरुण सालेकर हे भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.



