शुभम गजभीये
विशेष प्रतिनिधी..
श्री.विजय गावंडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी यांच्या सुचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ते १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मतचोरीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम चिमूर तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
त्याचा शुभारंभ उद्या दिनांक २६ सप्टेंबर २०२५ पासून करण्यात येत आहे.
तसेच अतिवृष्टी व शेत पिकावर रोगराईने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे चिमूर तालुका ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी व शेतकरी,विद्यार्थी, महिला (लाडकी बहिण योजना), संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी यासह विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन चिमूर तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येत आहे.
तरी जेष्ठ काँग्रेस नेते मंडळी,माजी तालुकाध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक,तालुका महिला काँग्रेस पदाधिकारी,तालुका युवक काँग्रेस पदाधिकारी,तालुका युवती काँग्रेस पदाधिकारी,फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धरणे आंदोलन स्थळ तहसील कार्यालया समोर असून दिनांक २६/९/२०२५ रोज शुक्रवारला दुपारी १२ वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस कमिटी चिमूर,बाळू बोभाटे सचिव चिमूर शहर काँग्रेस कमिटी यांनी दिली आहे.



