दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
नागपूर खामला रमाई भवन येथे,सत्यशोधक समाज पदाधिकारी व समाज बांधव यांच्या वतीने आयु.विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक रा.वरोरा,जिल्हा चंद्रपूर व आयु.अनुताई विनोद खोब्रागडे यांना राष्ट्रीय बहुजन मित्र पुरस्कार,मेडल,गोल्ड पेन,व पंचशील गळ्यात टाकुन जाहीर सत्कार व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन धर्मेश पाटील व संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी केले होते.कार्यक्रम खुल्या पटांगणात ठेवण्यात आले होते.मात्र वेळेवर खुप मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने,रमाई भवन येथे कार्यक्रम पार पडला.

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या विचारांवर व कार्यावर आधारित,”रमाई एक पात्र,नाटकाचे सुध्दा सादरीकरण करण्यात आले.
सत्कार पुर्वक मार्गदर्शन करताना आयु.विनोद खोब्रागडे यांनी अनेक सामाजिक प्रश्न दीक्षाभूमी नागपूर,दीक्षाभूमी चंद्रपूर,अंबाझरी नागपूर,भीमा कोरेगाव पुणे,महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार यावर प्रकाश टाकला..

एक पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक आयु.विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वकिल मंडळी विरुद्ध एट्रासिटीचा कलमानुसार FIR दाखल कल्यामुळे व काही वकिल मंडळी विरुद्ध न्यायालयाचा आदेशानुसार FIR दाखल केल्यामुळे,तसेच अनेक वकिल मंडळी विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहीता 2023 चां कलमा ३७९ नुसार फौजदारी केस दाखल केल्यामुळे,चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण 1000 चा वर वकीलांनी प्रथम ठराव घेऊन व नंतर बोगस तक्रार देण्यासाठी १०० च्या वर वकील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करतात,आंदोलन करतात,कोर्टाचे कामकाज बंद करतात,केंद्रीय मंत्री यांना फोन करतात व माझ्या जामीन साठी विरोधात करतात असा गंभीर व थरारक घटनाक्रम त्यांच्या आयुष्यातील आहे असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

वकीली हा पेशा आहे,व्यवसाय नाही असे सर न्यायाधीश भुषण गवई हे जाहीर कार्यक्रमात सांगतात पुरावा दैनिक तरुण भारत पहा…
नागपूर येथील सरकारी वकील राहीलेले जेष्ठ वकील अँड.राजेश नायक यांची गाडी चंद्रपूर च्या वकिलांनी खिळे टोकुन चारही चाके पंचर केली होती.
एट्रासिटीचा गुन्ह्यातील आरोपींना कलम 18 नुसार जामीन नसतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी अधिकारी व वकील आरोपींना तात्काळ जामीन एका दिवसात कसा मिळाला? याबाबत सर्व पुराव्यानिशी विनोद खोब्रागडे यांनी नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करताना माहिती दिली.

सत्य शोधक समाज मंडळाचे पदाधिकारी यांनी ही संपूर्ण माहिती सर न्यायाधीश भारत देश व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती,मुंबई गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष,अनेक सामाजिक संघटना,राजकीय संघटना,यांच्या पर्यंत पोहचावी व सत्य जनतेसमोर आनावे आणि समाजाला जागृत करावे,तद्वतच अनेक विनोद खोब्रागडे जिल्हात,महाराष्ट्रात,भारतात तयार करावे असे आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अनुयायी व समाजबांधव उपस्थित होते…



