ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा – येथील रेस्ट हॉउस मध्ये आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. परिसरातील अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी खालील पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.
कुरखेडा तालुका प्रभारी – भूषण दुमाने
कुरखेडा तालुका कार्याध्यक्ष पदी – दिलीप सहारे
कुरखेडा युवा अध्यक्ष पदी – हर्षल भानारकर
रामगड सेक्टर प्रमुख पदी – भूपेंद्र बन्सोड
यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रवक्ते प्रितेश अंबादे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन कांटेंगे, विधानसभा अध्यक्ष ऋषीं सहारे, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, शेतकरी आघाडी अध्यक्ष सचिन गेडाम, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, आरमोरी युवा अध्यक्ष लकी पाटील तथा तालुक्यातील युवक व नागरिक उपस्थित होते.
जनतेच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार व युवकांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन आजाद समाज पार्टी युवकांची ताकद उभी करून जास्तीत जास्त युवा उमेदवार मैदानात उतरवून काँग्रेस-भाजप समोर आव्हान उभे करणार असे आजाद चे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.



