कालची लढाई ही परकिया विरूद्ध स्वकीयांची( मूळ भारतीयांची ) होती.आर्या विरुद्ध अनार्य,परकीय मुस्लिमां विरूद्ध स्वकीय हिंदू,(म्हणजे sc,st,obc, आणि धर्मांतरित मुस्लिम,ख्रिश्चनांचे पूर्वज). परकीय इंग्रजा विरुद्ध भारतीय,अशी कालची लढाई होती.ती भारत ( भू भाग ) जिंकण्यासाठी आणि त्यावर राज्य करण्यासाठी.
15 ऑगस्ट 1947 आणि 17 सप्टेंबर 1948 पर्यंत राजेशाही,हुकुमशाही आपल्या देशावर राज्य करीत होती.त्यानंतर लोकशाही म्हणजे लोकांना आपले मत दान करून येथील जमीनदार आणि भांडवलदारांना निवडून देण्याचा अधिकार मिळाला.
आणि बहुजन जातींच्या लोकांना आरक्षणाद्वारे सत्तेत भागीदारी मिळाली.पण बहुजनांच्या हाती अजूनही सत्ता आली नाही,मिळाली नाही,दिली नाही.
बहुजनांना मताचा अधिकार मिळूनही त्यांनी सत्ता आपले हाती घेतली नाही,बहुजन नेते केवळ जमीनदार आणि भांडवलदारांच्या पालखीचे मानाचे भोई म्हणूनच राहिले,असे हे वास्तव वर्तमान आहे.
याचा अर्थ बहुजन शोषित आणि अल्पजन ( अभिजन ) शोषक यांची लढाई आता सुरू झाली आहे.म्हणजेच गोरे गेले काळे आले.तरी सत्तेत जे आज काळे भारतीय आहेत,त्यांचा डी.एन.ए.हा परकीयच आहे,जे संख्येनी 15 टक्केच आहेत,जे सत्तेचे मालक आहेत.
आणि जे 85 टक्के आहेत ते बहुजन भारतीय म्हणजे स्वकीय आहेत,यात धर्मांतरित ब्राम्हण,मुस्लिम,हिंदू,ख्रिश्चन,बद्ध आहेत.
जातीय दृष्टीने हे बहुजन आहेत,पण वर्गीय दृष्टीने यांच्यात पण जमीनदार,भांडवलदार आहेत.म्हणून आजची लढाई ही दुहेरी आहे,ती म्हणजे 15 टक्के परकीय विरूद्ध विरूद्ध 85 टक्के स्वकीयांची आणि 15 टक्के जमीनदार-भांडवलदार विरुद्ध 85 टक्के मध्यम आणि गरिबांविरुद्धचा लढा आहे.
हल्ली मात्र जी लढाई चालू आहे,ती म्हणजे आरक्षणाची लढाई,म्हणजेच जाती विरुद्ध जातींची लढाई.प्रवर्गाविरुद्ध प्रवर्गाची लढाई जसे की,ओबीसी विरुद्ध मराठा,धनगराविरुद्ध मराठा,लिंगायत विरूद्ध मराठा,एस.टी.विरुद्ध बंजारा,नवबौद्ध विरूद्ध मातंग अशा लढाया चालू आहेत.
अर्थात या सत्ताधारी वर्ग ( जमीनदार भांडवलदार ) यांनीच लावल्या आहेत.यासाठी की,आपली सत्ता हातची जाऊ नये म्हणून.अशी ही आजची लढाई आहे.फारच गुंतागुंतीची आणि किचकट आहे.
कारण भारतीय समाज हा जाती आणि वर्गात विभागल्या गेला आहे.त्याला धर्माची झालर आहे.अजून ही एक मोठी अडचण.
भारतीय समाजास जेव्हढे जातीचे धर्माचे आकलन आणि शिक्षण आहे,तेव्हढे राजकीय शिक्षण आणि आकलन नाही.म्हणूनच तर परिवर्तन किंवा क्रांती इथे होत नाही.कुणीही यावे,आमच्यात भांडणे लावावीत आणि आमच्यावर खुशाल राज्य करावे,अशी आमची अवस्था आणि व्यवस्था आहे.
कधी आम्ही शहाणे होणार ? ते आमच्या महामानवना आणि संत महात्म्यांनाच माहित.


