Home Political देसाईगंज येथे काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीस आमदार रामदास मसराम यांची उपस्थिती…

देसाईगंज येथे काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीस आमदार रामदास मसराम यांची उपस्थिती…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :– देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देसाईगंज येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

       आढावा बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकट करणे, स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणे तसेच सामान्य माणसाला काँग्रेस प्रवाहात आणत निवडणुका काबीज करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, येणाऱ्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन भर देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

       यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक सचिन नाईक, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस तालुका कमिटीचे अध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, माजी सभापती परसराम टिकले, माजी जिल्हा परिषद सभापती यादवरावजी ठाकरे, मुखरुजी पत्रे, जेसा मोटवानी, माजी उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते गणीभाई शेख, माजी नगरसेवक गणेश फाफट, माजी नगरसेवक आरिफ खाननी,ॲड. संजय गुरु, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमाला पेंदाम, माजी नगरसेवक निरोफार शेख, माजी काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष आरती लहरी, महिला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष पुष्पाताई कोहोपरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

       आढावा बैठकीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात संघटन अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.