Home क्रीडा तालुका पावसाळी शालेय स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा मध्ये हरिहर विद्यालय चे -७...

तालुका पावसाळी शालेय स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा मध्ये हरिहर विद्यालय चे -७ खेडाळुची जिल्हा क्रीडा स्पर्धेत निवड…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी नागपूर व्दारा आयोजित पारशिवनी तालुका स्तरीय पावसाळी शालेय स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा महात्मा गांधी महाविद्यालय (M.G. College) पारशिवनी येथे 20 सप्टेंबर 2025 ला येथे घेण्यात आल्या होत्या.

               तालुका स्तरीय पावसाळी शालेय स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा मध्ये हरिहर विद्यालय चे प्रिंस मेघर यांची८०० मिटर, लोकेश बावणे यांची३००० मिटर, निकेश दहिया यांची२०० मिटर दौड मध्ये तसेच लांबउड़ी मध्ये रेश्मा नागपुरे , नजिविका एकनाथ, गोलाफेक थालीफेक मध्ये देवांशु चकोले यांची निवड जिल्हा स्तरिय स्पर्धे करिता निवड झाली आहे.

          या मैदानी स्पर्धमध्ये (अथेलेस्टिक) मध्ये 100 मीटर धावणे,200 मीटरधावणे 400 मीटर, 600 मीटर 800 मीटर 1500 मीटर, 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजीत केल्या होत्या तसेच लांब उडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, हातोडा फेक, या स्पर्धा सुध्दा आयोजीत केल्या होत्या.

              या स्पर्धे मध्ये हरीहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पारशिवनी येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारली यामध्ये 800 मीटर रनिंग U-19 वर्षाखालील मुलाच्या गटात प्रिन्स ‘मोरेश्वर मेंघर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. 19 वर्षे वयोगटात मुले 3000 मीटर धावने प्रकारात लोकेश गंगाधर बावणे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. 17 वर्ष वयोगट मुले मध्ये हायस्कुल विभागातुन निकेश दशरथ दहीया याने 200 मीटर मध्ये प्रथम स्थान प्राप्त केले.

          19 वर्ष वयोगटतील 100 मीटर स्पर्धेमध्ये प्रिन्स मेघर ने द्वितीय स्थान पटकावले. 19 वर्ष वयोगटतील 200 मीटर मध्ये मंथन धोटे द्वितीय स्थान पटकावले. 17 वर्ष वयोगटतील दिशान शानू कुरेशी द्वितीय क्रमांक मिळवला.

         लाब उडी मध्ये 14 वयोगट मुली मध्ये रेशमा योगेश नागपूर नीरज नागोसे याने प्रथम क्रमांक पटकवला.

               नजीविका कृष्णा एकनाथ, आराध्या कैलास मेघर याने अनुक्रम११ प्रथम व नव्दितीय स्थान प्राप्त केले.19वर्षाखालील मुले गोलाफेक व थाळी फेक स्पर्धेत देवांशू प्रदीप चकोले यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

            यशस्वी विद्यार्थ्यांचे दि रुरल एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर जी फुलबांधे व संस्थेचे सचिव श्री. ज्ञानेश्वरजी लोहकरे तसेच हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय/ शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत जी वानखेडे पर्यवेशिका सौ.जयश्री निंबाळकर मॅडम, पाळी प्रमुख श्री रामटेके सर शारीरिक शिक्षण व्यवस्थापक श्री. रणजित ढोपरे सर, शारीरिक शिक्षक श्री.राजेश इटकीकर सर, जगदीश मोहाड सर, धम्मदीप जामगडेसर, प्रकाश महाले सर, गावंडेसर, नंदेश्वर सर, बोरकर सर, गेडाम सर कुंभरे सर, गोमकळे मॅडम ठाकरे मॅडम, व सर्व हरिहर विद्यालयातील शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.