Home Vidarbha अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू… — पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत पालोरा...

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू… — पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत पालोरा गावातील घटना… 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

         पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत पारशिवनी रामटेक रोडवरील पालोरा व स्थानकावर रात्रीच्या सुमारास एका वेडसर व्यक्तीस ट्रकने किंवा अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला. 

        पालोरा येथील प्रकाश मनोहर पांडे यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलीस स्टेशन येथे दिनांक १४/९/२५ ला गुन्हा दाखल करण्यात आले.

        याबाबत थोडक्यात हकीकत अशी की अमोल प्रकाश पांडे रात्रीच्या वेळेला झोपेतून उठून कुठेतरी गेला असल्याची आईने माहिती दिल्यावर मी स्वतः त्याला पाहण्याकरता रोड कडे गेलो असता पहाटेला साडेचार वाजता तो रक्ताच्या थारोळ्यात रोडवर पडलेला दिसला त्याच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाने चाके नेल्यामुळे तो चेंदामेंदा झालेला होता.

       तात्काळ पारशिवनी पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व अमोलला ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

        अमोल प्रकाश पांडे वय 27 वर्ष हा मुंबई येथे दिनश्या कंपनीमध्ये कामावर होता. पण तीन महिन्यापासून त्याच्या डोक्यात फरक पडल्यामुळे तो पालोरा या गावी आलेला होता. त्याचा औषधोपचार नागपूर येथील रुग्णालया सुरू होता. या वेडेपणात तो कुठेही निघून जात होता. त्याच्यावर सर्व लक्ष ठेवून होते पण 14 च्या रात्री तो झोपेतून उठून रोट कडे गेला.

        अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याच्या मृत्यू झाला पुढील तपास पारशिवनी पोलीस ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत.