सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली तहसिल कार्यालयाच्या वतीने सावली तालुक्यात सेवा पंधरवडा चे आयोजन केले असून यात जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन सावली तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी केले आहे.
दिनांक 12 सप्टेंबर, 2025 ते 15 सप्टेंबर, 2025 या कालावधीत पांदन रस्ते शिवार फेरी मोहीमेचे 25 गावामध्ये आयोजन केले आहे.
दिनांक 16/09/2025 व 18/09/2025 रोजी सावली तालुक्यातील सर्व पांदण रस्ता यादीचे ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा घेवून पांदन रस्त्याचे वाचन करणे.
सर्वासाठी घरे या उपक्रमातंर्गत शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास 29 प्रस्ताव प्राप्त झाले आहे. सदर प्रस्तावावर कार्यवाही करुन पट्टे वाटप करण्यात येणार आहे.
वर्ग 2 च्या जमीनी चुकीने वर्ग 1 झाल्या त्यांचे वर्ग 2 मध्ये दुरुस्ती करणे. वर्ग 1 मधून चुकीने वर्ग 2 झालेल्या जमीनीचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे. या प्रकारे 139 प्रकरणाचे शोध घेण्यात आला असून सेवा पंधरवाडा मध्ये सातबारा दुरुस्ती करण्यात येणार आहे.
स्मशानभुमी नसलेल्या गावात स्मशानभुमी करीता जागा निश्चित करण्यात येणार आहे.
वर नमूद प्रमाणे सावली तालुक्यात सेवा पंधरवाडा चे नियोजन करण्यात आले असून या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी केले आहे.


