निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : भंडारा जिल्हास्तरीय “आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा” चे बक्षिस वितरण समारंभ (रवि. १४ सप्टें.) ला वैनगंगा शिक्षण महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला. यात पहिले पवनीने, दूसरे लाखनीला, तिसरे भंडारा तर विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमात मुख्य शहर साकोलीने पटकाविला. जिल्ह्यातील सर्व श्री गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली.
वैनगंगा बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने “आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५” आयोजित करण्यात आली होती. या बक्षीस वितरण समारंभाला मंचावर माजी खासदार सुनिल मेंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण, तहसिलदार निलेश कदम, वैनगंगा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.सोमदत्त करंजेकर, माजी आमदार बाळा काशिवार, पत्रकार चेतन भैरम, माजी नगरसेवक ॲड.मनिष कापगते, पुष्कर करंजेकर, गणेशोत्सव जी.एस. आवरकर, से.नि. प्राचार्य प्रकाश मस्के, ताराचंद लंजे व अन्य हजर होते. या पुरस्कारात प्रथम नवयुवक बाल गणेश उत्सव मंडळ पवनी यांना द्वितीय ( विभागुन ) एकता गणेश उत्सव मंडळ गोकुलधाम लाखनी व आदर्श गणेश उत्सव मंडळ चिचटोला पळसगाव यांना तृतीय नव बजरंग गणेश उत्सव मंडळ, बजरंग चौक भंडारा यांनी मिळविला.तर विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमात श्री बाल गणेश उत्सव मंडळ गणेश वार्ड साकोली यांना विशेष पारितोषिक मिळाले.
समारंभात अतिथींनी आपल्या भाषणात सांगितले की, श्री गणेशोत्सवात विविध जनजागृती बरोबरच व्यसनमुक्ती, मोबाईलचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम, सायबर क्राईम जनजागृती, शासकीय नियमावलींची जनजागृती करावी. जेणेकरून समाजात चांगला संदेश दिला जाईल.
आपल्या प्रास्ताविकात डॉ.सोमदत्त करंजेकर हे म्हणाले की, सातत्याने हा उपक्रम आमची संस्था राबवित आहे हे यासाठी की, सर्व समाज एक होऊन श्री गणेशोत्सव माध्यमातून दहा दिवसीय आनंदमय वातावरण आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी ओढ लागली पाहिजे हा मुख्य उद्देश आहे.
या बक्षीस वितरण समारंभाला संचालन प्रा. संजय निंबेकर यांनी केले. येथे वैनगंगा बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्थेतील प्रा. जितेंद्र ठाकुर, आशिष भिवगडे, दिनेश कापगते, गणेशोत्सव परीक्षक चमुचे आर. बी. अग्रवाल, डॉ.पाखमोडे, डॉ.गायकवाड, युवराज कापगते, डॉ.राजेंद्र खंडाईत, डॉ.थुल, बाबुराव निखाडे, अशोक नवखरे, भावेश कोटांगले, दिलीप करंबे, सुधाकर मुंगुलमारे, योगराज वरखडे, डॉ. पाठेकर, डॉ. बागडे, प्रा. प्रमोद शेंडे आदींनी परिश्रम घेतले.



