कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर अंतर्गत पारशिवनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२–२६ चे आयोजन तालुका क्रिडा अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक ८ व ९ सप्टेंबरला महात्मा गांधी महाविद्यालय पारशिवनी येथे करण्यात आले.
या स्पर्धेत राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथील चौदा वर्षीय वयोगटात मुले आणि मुलींच्या कबड्डी संघाने अंतिम विजेतेपद पटकावले तसेच १७ वर्षीय वयोगटात मुलांचा कबड्डी संघ अंतिम उपविजेता ठरल्याने परिसरातील पालकवर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शाळेच्या वतीने विजयी संघातील खेळाडू त्रिवेणी सावरकर, आयुषी पंधराम, कल्याणी मेंढेकर, आभा भरदिया, गौरी मेश्राम, त्रिशा सावरकर, सुजाता पानवारे, अंजली अंबाडारे, हर्षु पिल्लारे, सेजल राऊत, अनिकेत सहारे, रुद्राक्ष सोनटक्के, प्रज्वल खंडाते, पंकज धुर्वे, अन्वेष दुनेदार, स्वयम भागडकर, तन्वीर पिल्लारे, हिमांशु डोंगरे, आरव सावरकर, सुमित पनवारे, पार्थ गजाम, प्रणय ऊर्नाल, दीपांशु पंधराम, चंद्रभान सहारे, आयुष पंधराम, नकुल इनवाते, अनुश मेश्राम, प्रणव ढोंगे, नैतिक वरठी, अनुज राऊत, प्रथमेश राऊत यांचा मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला.
यावेळी खेळाडूंनी त्यांच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक साक्षोधन कडबे, प्रशिक्षक मनीष राऊत व मुख्याध्यापक राजू बर्वे यांना दिले. यावेळी दिलीप पवार, रितेश मैंद, सतीश जुननकर, अमित मेश्राम, शालेय कर्मचारी लिलाधर तांदूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.



