शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.तरीही दुरावस्थ रस्त्याकडे कोणाचेही लक्ष नाही जात नाही.यामुळे नेरी येथील नागरिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना व राजकीय पदाधिकाऱ्यांना म्हणून लागले,तुमचा कारभार कसा?
वार्ड क्रमांक ४ मधील लोनकर राईस मिल ते संजय डोंगरे यांच्या घरापर्यंत रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.गावातील नागरिकांचा प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाज माध्यमावर या रोडवर ट्रक फसल्याचे फोटो व्हायरल केले आणि लोकप्रतिनिधींना असीच का तुमची राजनीती? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
तद्वतच या रस्त्याचे सुधारणेसाठी दै.महासागर मधुन कित्येकदा प्रकाश टाकण्यात आला,तरी देखील
प्रशासनाचे अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना या रस्त्याचे सुधारणेसाठी जाग आली नाही.त्यामुळे त्यांना जनतेच्या समस्येची जानच नसल्याचे दिसून येत आहे.
२५ वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.आता हा रस्ता जागोजागी खड्डेमय झाला आहे.तद्वतच जि.प.बांधकाम विभाग चिमुर यांचेकडून सदर रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही
दिनांक ९-९-२५ ला रासायनिक खतांने भरलेला ट्रक या रस्त्यावर फसला आहे.त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.आज तागायत तो ट्रक काढण्यात आला नाही.
याला प्रशासन व आवाज न उठविणारे उदासीन लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.ट्रक फसल्यामुळे बाजूचे दुकाने झाकल्या गेली आहेत.सदर दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे चालणेही मुश्किल झाले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अशीच परिस्थिती राहील्यास व रस्त्याचे बांधकामाला सुरुवात न केल्यास याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



