Home Maharashtra महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिमूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले जनआंदोलन…

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिमूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले जनआंदोलन…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..

        महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर लावण्यात आलेले अंकुश होय व लोकशाही सह नागरिकांच्या अधिकाराचे दमन करणे होय.

      तद्वतच नागरिकांनी सरकारच्या विरोधात व आपल्या संरक्षणार्थ आंदोलन करु नये यासाठी महाराष्ट्र सरकारने,”महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणला आहे.हा कायदा म्हणजे सत्ताधाऱ्यांची एक प्रकारे हुकुमशाह कार्यपद्धत होय.

            म्हणूनच या काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी व हा कायदा रद्द करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांद्वारे व कार्यकर्त्यांद्वारे जोरदार जनआंदोलन करण्यात आले.

          आज चिमूर येथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी डॉ.सतीश वारजूकर,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गजानन भाऊ बुटके,तालुका काँग्रेस कमिटी चिमूर अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील,चिमुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भाऊ पोतराजे, शिवसेनेचे देविदासजी गिरडे,सुरेश गजबे,कवडूजी खेडकर,विवेक कापसे,शहराध्यक्ष अविनाश अगडे,पप्पू शेख,सुभाष बनसोड,दिवाकर मेश्राम,बंडूजी हिवरकर,युवा नेते संदीप कावरे,विनोद राऊत,राजू चौधरी,युवक काँग्रेसचे प्रशांत डवले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते जनआंदोलनात उपस्थित होते.

      यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.राज्य सरकारने अमलात आणलेले महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे घटना विरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.

       सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व्हावी व हुकूमशाही यंत्रणा बळकट व्हावी हा सरकारचा कुटील हेतू आहे.त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे अशी मागणी आंदोलन कर्त्यांद्वारे करण्यात आली.