Home Social कु.मंगल मिसाळ यांना बेस्ट टीचर पुरस्कार!.. — अनेकांनी केले मिसाळ यांचे...

कु.मंगल मिसाळ यांना बेस्ट टीचर पुरस्कार!.. — अनेकांनी केले मिसाळ यांचे अभिनंदन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

          दातीवली दिवा पूर्व येथील एस.एम.जी.विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देवून त्यांना सुसंस्कृत करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कलाकुंजच्या ठाणे येथील सुपरिचित कवयित्री तथा शिक्षिका कु.मंगल शामराव मिसाळ यांना यंदाचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबईतील शब्दभाव मोती समुहाचा बेस्ट टीचर पुरस्कार बहाल झाला आहे.

       गेल्या काही वर्षांपासून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी त्या शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.एवढेच नाही तर साहित्य क्षेत्रात त्यांना अमाप आवड आहे.अनेक काव्यरचना त्यांनी लिहुण काढल्या आहेत.

       महाराष्ट्रातील अनेक कविसंमेलनात त्यांनी भाग घेत सन्मान पुरस्कार प्राप्त केले आहे.

        दरम्यान त्यांना शिक्षकदिनी बेस्ट टीचर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उपराजधानी नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे,राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, भद्रावतीच्या समाजसेविका रजनी रणदिवे, व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते,किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता अंजली गुंडावार, जेष्ठ साहित्यिक संजीवनी धांडे, सविता कोट्टी, योगशिक्षिका वैजयंती गहुकर, पथ्रोडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे,या शिवाय महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार, वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या सुपरिचित रांगोळी आर्टीस्ट साक्षी वाडगूरे, नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम,चंद्रपूरच्या अंजली इटनकर, अपर्णा चिडे, समता बन्सोड, अर्चना समर्थ ,अर्चना चावरे, पुण्याच्या पत्रकार कु.स्नेहा मडावी, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, कविता जुमडे, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, सुवर्णा लोखंडे, अधिवक्ता प्रेरणा सहारे, अधिवक्ता सारिका टेंभरे, पत्रकार प्रियंका गायकवाड,प्रांजू मखरे ,विमल काटकर, वंदना हातगांवकर, वणीच्या रजनी पोयाम , सीमा पाटील,अश्विनी दीक्षीत,जयश्री दीक्षीत, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक,प्रविणा वाघाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.