Home Social “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बाप्पाला निरोप… ...

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बाप्पाला निरोप… — ढिवर समाज सेवा संघटनेच्या जीवन रक्षक पथक द्वारे बप्पाचे नदी पात्रात विर्सजन… — नगरपरिषद द्वारे विधृत रोषनाई,बँरिकेट,नियत्रण कक्ष आणि कुत्रिम तलावाची व्यवस्था..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान :- शहरात आणि ग्रामीण भागात ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात जंगी मिरवणुक काढुन गुलाब पुष्पांची उधळण करित कुत्रिम तलावात आणि नदी पात्रात विर्सजन करुन बाप्पाला भावपुर्ण निरोप देण्यात आला. 

             बुधवार (दि.२६) ऑगस्ट ला गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पांचे पारंपरिक पद्धतीने मिरवणु काढुन सार्वजनिक आणि घरोघरी गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

       सर्व कुटुंबे एकत्रित येऊन सतत रोज सकाळी आणि सायंकाळी आरती करुन भक्तीभावाने लाडक्या बाप्पांची पुजा अर्चना केली.सार्वजनिक ठिकाणी आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धा,भजन,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम परिसरात भक्तीमय वातावरणात साजरे करण्यात आले. 

            शनिवार (दि.६ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशी च्या दिवशी सकाळपासुन गणेश भक्तांनी ढोलताशा,डिजेच्या निनादात व गुलाल उधळत विर्सजन मिरवणु क काढुन ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवक र या ” च्या जयघोषात घरगुती गणपती बाप्पाचे कुत्रिम तलावात आणि रविवार (दि.७) ला सार्वजनिक मोठया श्री गणेश मुर्तीचे कन्हान नदी पात्रात विर्सजन कार्य सुरू असुन बाप्पाला भावपुर्ण निरोप देण्यात येत आहे.

 विसर्जन स्थळी नगरपरिषद व्दारे योग्य व्यवस्था..‌

      नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रशासना व्दारे माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत काली माता मंदिर घाट परिसर आणि नवीन नगरपरिषद प्रांगणात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता कृत्रिम तला वाची व्यवस्था करण्यात आली. 

             तसेच काली मंदिर परिसरात विद्युत रोषणाई,सीसीटीवी कैमरे,पिण्याचा पाण्याची व्यवस्था,निर्माल्य व्यवस्थापन,सुचना देण्या साठी साऊंड सिस्टमची व्यवस्था नगरपरिषद प्रशासना कडुन करण्यात आली. 

       ढिवर समाज सेवा संघटनेच्या जिवन रक्षक पथकाने कन्हान,पिपरी,कांद्री,टेकाडी सह ग्रामिण भागातील नारिकांच्या हजारोच्या संख्येत घरगुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे काली मंदिर घाट कन्हान नदी पात्रात आणि कुत्रिम तलावात शिस्तबध्द पध्दतीने विर्सजन करून गणपती बाप्पाला शांततेत आंनदाने निरोप देण्यात आला. 

विसर्जन स्थळी पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची भेट…

       नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी काली मंदिर परिसर विसर्जन स्थळी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि बंदोबस्ताचा आढावा घेत पोलीस अधिका-र्यांना आवश्यक सुचना दिल्या. 

      गणपती विर्सजन दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.राखीव दलाचे पथक तैनात करुन विशेष ठिकाणी फिक्स पाॅईंट लावण्यात आले.

       यावर्षी रेल्वे पोलीस सुध्दा रेल्वे फाटका जवळ तैनात होते.नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक घोडके,ढिवर समाज सेवा संघटना रामटेक विधानसभा अध्यक्ष बालचंद्र बोंदरे,कन्हान शहराध्यक्ष सुतेश मारबते, सचिव मनोज मेश्राम,कोषाध्यक्ष अँड. श्रीकांत मानकर,सदस्या सौ. रेखा भोयर,सौ.कुंदा कांबळे सह पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी,नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यानी विसर्जन स्थळी योग्य व्यवस्थेकरिता सहकार्य केले.