Home देशविदेश “माणूस” या पदास प्राप्त होण्यासाठी…

“माणूस” या पदास प्राप्त होण्यासाठी…

        या जगात माणसांची संख्या भरपूर आहे,परंतु “माणूस” या पदास प्राप्त झालेले फार कमी आहेत.नगण्य आहेत,म्हटले तरी चालेल.याचे कारण ” माणूस ” हा माणसाच्या जातीत जन्माला ,म्हणून त्यास माणूस म्हणतात,तो जनावराच्या जातीत जन्माला नाही.” माणूस ” हा माणसाच्या जातीला जन्मला असला तरी तो जनावर सारखाच वागतो,दिसायला म्हणजे वरून तो माणूस दिसतो,पण त्याचे वागणे हे जनावरांचे असते.म्हणजे तो आतून जनावर असतो.

       जनावरांना कमी बुद्धी असते,म्हणून ते खाणे पिणे,बसणे उठणे,संभोग करणे,पिल्लांची काळजी घेणे,स्वतःचे संरक्षण करणेसाठी प्रयत्न करणे ,फक्त एव्हढीच बुद्धी त्यांना असते,म्हणून ते स्वतःसाठी घर बांधू शकत नाहीत,खोपा बांधला तरी पिढ्यान् पिढ्या त्याच असतात,त्यात ते बदल करू शकत नाहीत,ते शस्त्र निर्माण करू शकत नाहीत,ते बाळगू पण शकत नाहीत,उन वारा पाऊस वादळ या पासून स्वतःचा बचाव करू शकत नाहीत,वस्त्र निर्माण करू शकत नाहीत,शेती कारखाने ,शिक्षण,आरोग्य पर्यावरण,राजसत्ता असा कोणतीही विषय त्यांना माहीत नसतो,याचे कारण त्यांना लिमिटेड बुद्धी असते,माणसाला मात्र अमर्याद बुद्धी असते. तो काहीही आणि कसेही विचार करू शकतो,आर्थिक ,सामाजिक,राजकीय,धार्मिक,आध्यात्मिक,सांस्कृतिक,इतिहास,भूगोल,मानसशास्त्र,वंशशास्त्र,पर्यावरण अशा अनेक विषयात माणसाची बुद्धी चालते.नवे नवे शोध आणि संस्कार यात पण त्याची बुद्धी चालते,असे असले तरी माणूस हा माणसाच्या पदास पात्र झाला नाही,म्हणजेच तो अजूनही परिपूर्ण माणूस बनला नाही,जनावरच राहिला,म्हणून तो फक्त जनावरांचे च वर्तन व्यवहार करताना दिसतात,त्या पैकी काही सिंह वाघ लांडगा या हिंस्र प्राण्यासाखे वागतात,तर काही माणसे कोल्हाप्रमाणे वागतात,तर काही ससा हरिण या भित्र्या प्राण्यासारखे वागतात,तर काही हत्ती,कासव या स्थिरबुद्धीच्या प्राण्यासारखे माणसे वागताना म्हणजेच व्यवहार करताना दिसतात.

       खरे तर माणूस मानव जातीत जन्मास येऊन माणसासारखे वागले पाहिजे,म्हणजेच ” माणसाने माणसासोबत माणसासारखे वर्तन केले पाहिजे.” पण असे दिसत नाही,माणसाचे कुटुंबातील व्यक्ती सोबतचे वागणे,शेजाऱ्याशी वागणे,गाकऱ्यांशी वागणे,समाजाशी वागणे ,देशाशी वागणे हे माणुसकीचे नसते,तर माणसाच्या विपरीत असते.अशी माणसे एव्हडी स्वार्थी असतात की,स्वतःचाच एव्हढा विचार करतात की,त्या पाण्याच्या हौदातील आई वान री प्रमाणे ,पाणी गळ्या पर्यंत येई पर्यंत ती तिच्या पिल्यास डोक्यावर घेते,पण जेंव्हा तोंडापर्यंत पाणी आल्याने आपण स्वतः मरू नये म्हणून आपल्या लेकरासच पायाखाली घेते ,आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते,याचा अर्थ जनावरे पोटच्या लेकरापेक्षाही स्वतःचा आधी विचार करतात,अशी स्वार्थी माणसे मग इतरांचा,समाजाचा,राष्ट्राचा काय विचार करणार ? स्वतः आयुष्य सारे संपती जमा करण्यात आणि ते सुरक्षित राहण्यासाठी सत्तेचा वापर करण्यात घालविणारे लोक जनतेचे ,स्वकीय समाजाचे तरी हित तरी काय करणार ? मुळीच नाही.अशी स्वार्थ माणसे म्हणजे ” माणूस ” या पदास प्राप्तच झालेली नसतात.माणसाच्या जन्मास जरी आले,तरी माणुसकी त्यांचे अंगी नसल्यामुळे ते माणूस असूनही जनावरेच होत.

   तसा विचार केला तर या जगात सज्जन माणूसकी असलेले माणसापेक्षा दुर्जनांचीच संख्या जास्त दिसते.जिथे दुर्जनांचा सुळसुळाट तिथे भांडणे मारामाऱ्या हिंसाचार असणारच.शांतीमय जीवनाचा उपभोग जनतेस कसे घेता येईल ? सज्जनांची संख्या पण बऱ्या पैकी असते.पण ते हरिण ससा हत्ती कासव प्रमाणे वर्तन करतात,म्हणून ते पण हिंसाचाराचे शिकार बनतात.खरे तर सज्जनांनी संघटित होऊन दुर्जनांशी लढा दिला तर दुर्जन पण माणूस नाही बनले तरी किमान माणसासारखे तरी वागतील,यासाठी दुर्जनां ची सत्ता जाऊन सज्जनांची सत्ता असली पाहिजे,तरच प्रत्येकास ” माणूस ” या पदास प्राप्त होणे शक्य होईल.पण यासाठी आधी समतेची व्यवस्था आणल्याशिवाय सज्जन सत्तेत जाऊ शकत नाहीत,विषमतावादी व्यवस्थेत दुर्जनच सत्तेत असणार. सगळीकडे स्वतःचेच वातावरण परिस्थिती असणार ,यामुळे सज्जन स्वार्थापुढे दुर्बल ठरतात.तरी पण या विषमतेच्या परिस्थितीतही सज्जनांनी निर्धार पक्का केला,आणि आत्मविश्वास जागविला,धैर्य स थारा दिला तर नक्कीच समतेची व्यवस्था निर्माण होऊ शकतो,जाणीव जागृतीच्या कार्यक्रमाने आणि संघटित होण्याने हे शक्य होईल.माणसाला ” माणूस ” या पदापर्यंत पोहोचण्यासाठी हे करावेच लागेल.

       दुर्जन म्हणजे अहंकारी ,क्रोधी,लोभी, द्वेषी,कपटी,स्वार्थी , माणूस.आणि सज्जन म्हणजे प्रेमळ,नम्र,सेवाभावी, त्यागी, विचारी,सम्यक दृष्टी ,समता,समानता,स्वातंत्र्य,बंधुभाव,न्याय जोपासणारा ,किंवा या विचाराचा माणूस म्हणजे सज्जन,इतरांचे दुःख दारिद्र्य आ द न्या न ,दूर करण्यासाठी झटणारे व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती होत,की जे ” माणूस ” या पदास पात्र असलेले.

   तुकडोजी महाराज त्यांच्या एका भजनात म्हणतात ” माणूस द्या मज माणूस द्या,माणूस शोधायला गेलो तर मला देव भेटला आणि तोही म्हणाला की मीही माणसाच्या शोधात आहे.सगळीकडे माणसे आहेत,पण ते माणसासारखे वागत नाहीत,माणसाच्या जन्मास येऊन पण.

      मानव जातीत जन्म घेऊन माणसासारखे वागण्यासाठी असे माणुसकीचे संस्कार झाले तरच प्राणी असलेला माणूस हा माणसाच्या पदास प्राप्त होईल.संस्कार हे समतेचे बंधुभावाचे,स्वातंत्र्याचे,न्यायाचे असले पाहिजेत तरच माणसाला “माणूस ” ही पदवी प्राप्त होईल.

       लेखक : दत्ता तुमवाड.

         सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक : 8 सप्टेंबर 2025.फोन : 9420912209.