शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर :- खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी चिमूर तालुक्यातील मौजा खडसंगी मंडळ महसूल क्षेत्रात पाण्यामुळे झालेल्या पिक व इतर नुकसानीची पाहणी करण्याकरिता काल दौरा केला होता.
दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे खासदार डॉ.नामदेवराव किसान यांची भेट घेऊन चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या विकास कामांवर चिमूर तालुका काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाऊ शेख यांनी सविस्तर चर्चा केली व निवेदनाद्वारे विकास कामांची मागणी केली.
निवेदनातंर्गत मागणी…
१) मुस्लिम समाजातील कब्रस्थान दफनभूमी येथे सौंदीकरण करण्यात यावे.
२) कवडशी केसलापूर येथील जनतेला येणेजाणे करण्याकरिता नदीवर ब्रीज कम बंधारा बांधण्यात यावे…
३) कोर्ट रोड माणिक नगरकडे जाणाऱ्या मार्गावर ब्रिज कम बंधारा बांधण्यात यावे…
४) चिमुर येथे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता मोठे कंपनी उद्योग उभारण्यात यावे…
५) इंदिरा नगर येथील अतिक्रम धारकांना कायमस्वरूपी पट्टे उपलब्ध करून देण्यात यावे आणि विकास कामा करीता निधी उपलब्ध करून देण्यात यावे.
खासदार महोदयांना निवेदन देते वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य गजाननभाऊ बुटके,जिल्हा काँग्रेस महासचिव सचिन गाडीवार,तालुका काँग्रेस अल्पांख्याक अध्यक्ष आरीफभाई शेख,मिडिया प्रमुख पप्पुभाऊ शेख,इरफान पठाण,बबलु भाई,राजु चौधरी,आकाश श्रीरामे सचिव,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे,श्रीकांत गेडाम इत्यादी उपस्थित होते.



