कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान :- शहर विकास मंच द्वारे भारताचे पहिले उपराष्ट्रपति,दुसरे राष्ट्रपति तत्वज्ञ आणि राजकारणी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा १३७ व्या जयंतीचे औचित्य साधुन शिक्षक दिवस कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामजी दखने कन्हान येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापिका हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.विशाखा ठमके कन्हान येथील बळीरामजी दखने हायस्कुलच्या मुख्याध्यापीका,माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव,माजी उपमुख्याध्यापक एकनाथ खर्चे आदर्श हायस्कुल,कन्हानचे माजी मुख्याध्यापक राजेंद्र गोंड,सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक शांताराम जळते,केंद्र प्रमुख वामन पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ.सर्वपल्ली राधा कृष्णन,देशाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले आणि दीप प्रज्वलन करुन सत्कार सोहळा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके,माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव,माजी मुख्याध्यापक राजेंद्र गोंड,माजी मुख्याध्यापक शांता राम जळते,माजी उपमुख्याध्यापक एकनाथ खर्चे,आदर्श हायस्कुल कन्हानचे मुख्याध्यापक गीरजाशंकर यादव,बळीरामजी दखने हायस्कुल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत,केंद्र प्रमुख वामन पाहुणे,शिक्षक देवेंद्र सेंगर,मोतीराम रहाटे, शशीकांत बोंदरे,जेष्ठ पत्रकार कमलसिंग यादव यांचा शहर विकास मंच च्या सदस्यांनी शाॅल आणि वृक्ष देऊन सत्कार केला.
मान्यवरांनी शिक्षक दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन उपस्थित शिक्षकांना शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले.
राष्ट्र गीत गायन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सदस्य अर्जुन पात्रे यांनी तर आभार प्रदर्शन महिला सदस्य जया हिवसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर,मार्ग दर्शक भरत सावळे,हिमांशु सावरकर,अर्जुन पात्रे, सौरभ गावंडे,साहिल सैय्यद,माहेर इंचुलकर,प्रणय लंगडे,जया हिवसे,पायल मेश्राम,नाना ऊकेकर,शुभम बावनकर सह सदस्यांनी परिश्रम घेतले.



