ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापक विनोद किरपान तसेच प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. स्वयंप्रशासन शाळा व्यवस्थापक म्हणून आराध्य खंडारे तर प्राचार्या अनुश्री चांदेवार, प्रशासकीय अधिकारी ज्ञान राऊत, पर्यवेक्षिका हिमानी टेंभुरकर उपस्थित होते.
डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवसभर विद्यार्थ्यांनी स्वयंप्रशासन राबवून शिक्षकांचे कार्य अनुभवले. प्राचार्या, प्रशासकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून दिले.
शाळेच्या प्राचार्या भारती व्यास यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान अधोरेखित करून त्यांना खरे शिक्षक दिनाचे हक्कदार संबोधले. विद्यार्थ्यांनी गीत, भाषणे तसेच शिक्षकांच्या कलागुणांचे विनोदी सादरीकरण करून कार्यक्रम रंगतदार केला.
सुत्रसंचालन कु. युक्ती गहाणे व कु. वंशिका पुस्तोडे तर आभार प्रदर्शन कु. रुची पारधी व रिद्धी रहांगडाले यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



