Home Social वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या प्रेम मुन्ना कास्देकर यांच्या कुटुंबांची मेळघाटचे आमदार केवलराम...

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या प्रेम मुन्ना कास्देकर यांच्या कुटुंबांची मेळघाटचे आमदार केवलराम काळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली भेट… — ५ लाख रुपयांचा धनादेश मृतकांच्या कुटुंबियांना सुपुर्द..‌

  अबोदनगो चव्हाण

जिल्हा प्रतिनिधी अमरावती..

         मेळघाट अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील राजदेवबाबा कॅम्प येथे गस्तीवर असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या प्रेम मुन्ना कास्देकर (वय ३०, रा. तारुबंदा) यांच्या कुटुंबियांना भेट देऊन आमदार केवलराम काळे व संबंधित वनाधिकाऱ्यांनी सांत्वन केले.

       त्यांच्या पत्नी निर्मला प्रेम कास्देकर यांना वनविभागाकडून ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.तसेच आमदार केवळराम काळे यांच्या वतीनेही आर्थिक मदत देण्यात आली.

           नरभक्षी वाघाला लवकरात लवकर पकडावे आणि या घटनेतील दोषीं अधिकारी यांच्यांवर कारवाई व्हावी,यासाठी राज्याचे वनमंत्री यांना पत्राद्वारे विनंती केली आहे असे आमदार म्हणाले.

      या वेळी सहाय्यक उपवनसंरक्षक प्राची उरले,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल धाईत,ठाणेदार अवतारसिंग चव्हाण,राजेंद्र महल्ले,झाल्टे साहेब,हंकारे साहेब,मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर,वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी,मृतकाचे नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.