Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… –विज वितरण कंपनी ग्राहकांना “थ्री फेज” झटका देण्याच्या तयारीत?.. 

ब्रेकिंग न्यूज… –विज वितरण कंपनी ग्राहकांना “थ्री फेज” झटका देण्याच्या तयारीत?.. 

 रोखठोक

प्रा.महेश पानसे…

        एकाच परिसरात दोन किंवा दोनपेक्षा अधिक विद्युत कनेक्शन नाकारून सरसकट “थ्री फेज” विद्युत कनेक्शन देण्याचा डाव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी साधण्याच्या तयारीत असल्याचे संकेत चचैत असून असे झाल्यास मोठा मानसिक व आर्थिक फटका बसणार असल्याचे चित्र आहे. 

        विद्युत पुरवठा अधिनियम (2005) मधील उपशिर्ष क्र.22.5 नुसार विज वितरण कंपनी आपला ‘पॉवर’ वापरणार असल्याची बाब पुढे येत आहे.

         वरील संदर्भिय विषयानुसार विद्युत वापरकर्तास आता अधिनियमानुसार एकाच परिसरात विद्युत वापराकरिता दोन किंवा अधिक विदयुत मिटर नाकारण्यात येणार आहेत.

       एकाच परिसरात घरेलू व गैर घरेलू किंवा सामान्य वापराकरिता विद्युत वापरकर्तास प्रत्येक उद्धेशाकरीता स्वतंत्र मिटरची मागणी करावी लागेल मात्र एकाचे नावे एकच मिटर हे कंपनीचे धोरण असणार आहे.यामुळे सर्व साधारण विद्युत वापरकर्तास मोठा त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

     एकाच परिसरात/ इमारतीमध्ये पिता- पुत्र किंवा दोन सख्खे भाऊ वेगळे राहात असतील तर नवीन नियमानुसार आवश्यकता असूनही त्यांना आता स्वतंत्र विद्युत वापरकरीता वेगळा मिटर मिळणार नाही व ही बाब त्रासदायक ठरणार आहे. 

       भविष्यात विद्युत वापरकर्ते या नवीन नियमांमुळे त्रस्त होण्याची शक्यता वाढणार आहे. वेगळे स्वतंत्र शिंगल फेज मिटर न देता एकाच परिसरात एकच थ्री फेज मिटर मंजूर करण्यात आल्यास स्थीर आकार, युनिट चे वाढीव दर व 100,200 युनिट नंतरचे चे भारी दर यातून वापरकर्ते यांना मोठा आर्थिक फटका बसेल. 

         इमारतीमध्ये एका पेक्षा अधिक ब्लॉक असतील तर दोन मिटर नाकारून “थ्री फेज” ची वाट विज वितरण कंपणी दाखवेल,तर ग्राहकांना बसणारा झटका मोठाच असेल असे जाणकार बोलताना दिसतात.