शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- ५ सप्टेंबर शुक्रवार पैगंबर मुहम्मद यांच्या १५०० व्या जयंतीच्या शुभ प्रसंगी चिमूर शहरात ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला आहे .या पवित्र सणाबाबत संपूर्ण शहरात आनंद उत्साहाचे वातावरण आहे. रजा सुन्नी मस्जिद मध्ये सकाळी ८ : ३० वाजता धार्मिक ध्वजारोहण करण्यात आला.
सर्व मुस्लीम बांधव एकत्रीत होऊन ९:३० वाजता संयुक्त जुलूस रॅली आबादी वार्ड, मासळ रोड, मार्गे स्व. अटलबिहारी वाजपेयी चौक मुख्य रस्त्याने हुतात्मा स्मारक नेहरू चौक शहीद, बालाजी रायपूरकर चौक, नेहरू विद्यालय, मस्जिद, मार्केट लाईन मार्गे चावळी चौक, वाल्मीक चौक मार्गे, पंचशील चौक सुन्नी मस्जिद येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
सर्वधर्म समभावाने दर्शन घडवीत ठानेदार दिनेश लबडे यांनी रॅलीतील मुस्लीम बांधवाचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. तर रजा फाउंडेशन ने मस्जिद चे इमाम मौलाना तंजीम रजा व ठाणेदार दिनेश लबडे यांचा शाल व हार देवून सत्कार केला.
ठिकठिकाणी रॅलीत मध्ये उपस्थित लोकांना व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.जुलूस रॅलीचे नेतृत्व सुन्नी मस्जिदचे मौलाना तंजीम रजा यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले.
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्याने शहरात अनेक ठिकाणी सजावट करण्यात आली आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ एक सण नाही तर प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश देखील देतो.
मिरवणुकीच्या समाप्तीनंतर, रजा सुन्नी मस्जिद कमेटी तर्फ (महाप्रसाद) आयोजित करण्यात आले ज्यामध्ये सर्व धर्मांच्या नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.



