शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा नेरी येथे मच्छर भगाव मोहीम राबविण्यात येत आहे.
सद्यास्थीतीत पावसाळ्याचे दिवस सूरु असल्याने अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे.
पावसाचे पाणी काही सखल भागात साचल्याने मच्छरांची उत्पत्ती होवून डेंग्यू,मलेरिया,चिकुनगुनिया,टायफाईड अशा आजारांना वाव मिळु नये यासाठी नेरी ग्रामपंचायत च्या वतीने धुर फवारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
डेंग्यू आजाराचे मच्छरांचा व अन्य या धुर फवारणीमध्ये मृत्यू होत असल्याने या आजाराचा फैलाव रोखण्यात ही धुर फवारणी मोहीम यशस्वी ठरणार आहे.
गावातील सहाही वार्डात धुर फवारणी करण्यात येणार आहे.रात्रोच्या सुमारास धुर फवारणी करण्यात येत असून मच्छरांचा नायनाट केला जात आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सरपंच रेखा पिसे,उपसरपंच चंद्रभान कामडी,ग्रामपंचायत सदस्यगण व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.



