शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- पैगंबर जयंती जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त चिमूर शहरात राजा सुन्नी मस्जिद कमेटिच्या वतीने जुलुस (शोभायात्रा) काढण्यात आले.
याप्रसंगी जामा मस्जिद चौक चिमुर येथील मुस्लिम युवा तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वता उपस्थितीत जुलुस मधील सर्व लहान मुला मुलींना,सर्व मुस्लिम बांधवाना,चिमुर येथील सर्व जनतेला व पोलिस बांधवांना ईद ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
या उत्सवानिमित्त चिवडा,लाडू व पाणी वाटप करण्यात आले.यावेळी सर्व मुस्लिम युवा वर्ग व मित्र मंडळी उपस्थित होते.



