Home Political स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास काँग्रेस पक्षाने केला… — काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार…...

स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास काँग्रेस पक्षाने केला… — काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार… — अक्कलकोट तालुका काँग्रेसची बैठक संपन्न…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

        देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे,प्रातांध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, सोलापूरचे निरीक्षक मोहनजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीची बैठक अध्यापक विद्यालय अक्कलकोट येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

         सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सातलिंग शटगार यांनी निवड झाल्याबद्दल अक्कलकोट तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी सत्कार केला.व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष डॉ.सुवर्णाताई मलगोंडा, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, मोतीराम चव्हाण, लक्ष्मण भोसले, सिद्राम पवार, मल्लिनाथ हात्ती, जहांगीर शेख उपस्थित होते.

       बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुवर्णाताई मलगोंडा होत्या. याप्रसंगी युवक काँग्रेसचे नुतन पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

        आपल्या मार्गदर्शनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळी देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. 35 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशातीलनागरिकांना खाद्यानाचा पुरवठा करणे ही देशासमोरची पहिली समस्या होती.

          त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचवार्षिक योजना आखून देशामध्ये धरणे, मोठमोठे प्रकल्प बांधण्याचे काम हाती घेऊन जलसंधारणाचे कामे सुरू केली. हरितक्रांती घडवून देशांमध्ये अन्नधान्य उत्पादन वाढविला. एवढेच नव्हे तर उद्योगधंदे, कृषी क्रांती, आरोग्य, शिक्षण, अवकाश या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाचा विकासामध्ये काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार यांनी अक्कलकोट तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी बोलताना केले.

          पुढे बोलताना म्हणाले खासदार प्रणितीताई शिंदे या गावागावात जाऊन रस्त्यावर उतरून लोकांची काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहायचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणूका जिंकण्यासाठी कामाला लागून नगरपरिषदेवर व पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचा तिरंगा फडकावू या असे आवहानही जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले.

         आपल्या मार्गदर्शक तालुकाध्यक्ष मुल्लीकार्जुन पाटील म्हणाले आगामी नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पक्षाचे विचार व केलेली विकास कामे प्रत्येक घराघरात जाऊन लोकांना पटवून सांगावीत. पंचायत समिती व नगरपरिषदेवर काळात काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी आपण सर्वजण एकत्रपणे काम करु असे सांगितले. 

        माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णाताई मलगोंडा म्हणाल्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे हे भाजपा सरकार लाडक्या बहिणीची ही फसवणूक करत आहे. पुढील काळात ही योजना बंद पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

         याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ.सुवर्णाताई मलगोंडा, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, व्ही. जे. एन. टी.सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, सिद्राम पवार, संजय भडके, मल्लिनाथ हत्ते, निशांत कवडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

      बैठकीचे सूत्रसंचालन व आभार गजानन जकिकोर यांनी केले.

          या बैठकीस हजरत पटेल, समर्थ भरमशेट्टी, रतनकुमार बिराजदार, हनुमंत फुलारी, प्रथमेश जानकर, अनिल करंडे, अकबर पिरजादे, कमाल मकानदार, गंगाधर बंदीछोडे, मशाक मुल्ला, प्रथमेश जाधव, मल्लिनाथ जांभळे, शिवानंद पाटील, पंडित माळी, सिद्धराम कालीबत्ते, चंद्रकांत महेंद्रकार लाडले साहेब घाटे राहुल चौगुले, दौलत शिंदे, विजय यादव,शरण गोगांव, अभिषेक दिंडोरे, सिताराम कोळी, रेवणसिद्ध नालवार, विनोद राठोड, सेवालाल चव्हाण, लखन जाधव, गणेश चिनवार, विजय स्वामी, हर्षदीप गायकवाड ,प्रतीक हाताळे, मौलाली पठाण, संजय तोडनूर ,शिवराया पुजारी, कुणाल जाधव , युनूस पटेल, जाफर पिरजादे, चंद्रकांत महेंद्रकर, विनोद राठोड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.