Home देशविदेश राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा…

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

        राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली येथे २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली होते. कार्यक्रमास डॉ.अशोक खोब्रागडे, प्रा. प्रशांत वासाडे, आणि डॉ.राम वासेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए. चंद्रमौली यांनी NEP मध्ये क्रिडा कौशल्य महत्वाचे असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरस्तीसाठी क्रिडाप्रकारात सहभाग घ्यावा असे मागदर्शन केले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन प्रा. राहुल बोबाटे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले. यावेळी वक्त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेचे महत्त्व, मेजर ध्यानचंद यांचे योगदान, आणि शरीरसौष्ठवाबरोबरच मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खेळांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

       याप्रसंगी क्रिडादिनाच्या औचित्याने विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बॅटमिंटन, कॅरम, बुद्धीबळ इत्यादी सांघिक सामने विद्यार्थ्यांचे घेण्यात आले.

         या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग व अन्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.