शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत मौजा खांबाडा येथील शेतकरी पंकज सहदेव नन्नावरे वय – ३३ वर्ष यांचा स्वत:च्या शेतातील बोडीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्टला ९ वाजता उघडकीस आली .
२९ ऑगस्टला पंकज नन्नावरे हा दुपारच्या सुमारास शेतावर गेला.पण तो परत आलाच नाही.घरच्यांनी राञोला शोधाशोध केली असता त्याचा काल पत्ता लागला नाही.३० ऑगस्टला काही शेतमजुरांना पंकजचा शव खांबाडा – महादवाडी शेतशीवारातील बोडीत तरगंताना दीसला.
याची माहीती गावकऱ्यांना दीली,तसेच पोलीस वीभागाला दीली.चिमूर पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजील्हा रूग्णालय चिमूर येथे पाठवीण्यात आले.
या अगोदर सुध्दा या बोडीत दोन इसमाचा मृत्यू झाल्याची माहीती मीळाली.अचानक पंकज नन्नावरे यांचा म्रूत्यू झाल्याने खांबाडा येथील नागरिक हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मागे बराच मोठा आप्त परीवार आहे.



