Home उपक्रम आळंदी नगरपरिषदेत “श्री गणेशा आरोग्याचा” अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न…

आळंदी नगरपरिषदेत “श्री गणेशा आरोग्याचा” अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे यांच्या आदेशानुसार आयोजित “श्री गणेशा आरोग्याचा” आरोग्य अभियानांतर्गत आळंदी नगरपरिषदेत दि. 30 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

          नगरपरिषद सभागृहात दुपारी 2 वाजता झालेल्या या शिबिरात नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी व नागरिक अशा एकूण 74 जणांनी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान रक्तदाब, मधुमेह, बी.एम.आय. आदींच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी आवश्यक औषधोपचार व जीवनशैलीत सुधारणा करण्याबाबतआरक्षण मार्गदर्शन केले.

        या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे नगरपरिषद सफाई कर्मचारी वर्गाचा मोठ्या संख्येने झालेला सहभाग. शहराच्या स्वच्छतेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या कर्मचारीवर्गाच्या आरोग्य संवर्धनासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले, असे उपस्थित नागरिकांनी नमूद केले.

         आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.