कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी ::-श्री बाल गणेश उत्सव मंडळ सुपर टाऊन पारशिवणी येथे दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सांयकाळी च्या दरम्यान रामटेक उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री रमेश बरकटे तसेच श्री राजेशकुमार थोरात व सुपर टाऊन परिसरातील भाविक भक्तांच्या हस्ते बाप्पांची आरती मोठ्या उत्साहाने करण्यात आलेली आहे.
या बाल गणेश उत्सव मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी परिसरातील अधिकारी तथा नागरिक यांचे हस्ते दररोज मोठ्या उत्साहाने आरती करून प्रसाद वितरण करण्यात येते असते अशी माहिती बाल गणेश उत्सव मंडळ सुपर टाऊन पारशिवणी यांनी एका पत्रकानुसार दिली.



