Home देशविदेश इतिहासकारांचा धार्मिक दृष्टिकोन… 

इतिहासकारांचा धार्मिक दृष्टिकोन… 

       हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जैन शीख बौद्ध इत्यादी कोणताही धर्म असो तो इतर धर्माचा द्वेष करीत नाही. इतर धर्मातील चुका शोधत नाही. एक धर्म दुसऱ्या धर्मावर टीका करीत नाही. तर प्रत्येक धर्म हा आपल्या धर्माची तत्वे सिद्धांत आणि त्यांचे आचरण करण्याची पद्धत आराधना पद्धत सांगत असतो. कोणताही धर्म हा संस्कृतीला बाधक नसतो याचा अर्थ खानपान पोशाख केशभूषा वेशभूषा भाषा कला गायन यास विरोध करीत नाही. इतर धर्माचा द्वेष करून भांडणे मारामाऱ्या करायला शिकवत नाही. सर्वच धर्म शांततामय सह अस्तित्वाचा उपदेश करतात. धर्म स्वातंत्र्य पण देतात, धर्म सोडला म्हणून किंवा इतर धर्माचा स्वीकार केला म्हणून त्यास कोणत्याही धर्मात शिक्षा नाही. 

     सत्य न्याय नीती, दया क्षमा शांती, प्रेम बंधुभाव समता समानता या मूल्यांची शिकवण ही प्रत्येक धर्माची असते, याला अपवाद फक्त वैदिक ब्राह्मण धर्म आहे, ज्यात विषमता ठासून भरलेली आहे. ज्यात एकसंघ समाजाचे चार वर्ण करून चार तुकडे केल्या गेले आहे, त्याची टोक म्हणजे मनुस्मृति ज्यात अस्पृश्यता आणि जातीयता पक्की केल्या गेले आहे. हा धर्म काल्पनिक आणि मिथ्यावर आधारित आहे. 

        सर्व धर्माच्या मुळाशी जाऊन विचार केला असता सर्वधर्माचे सार ” मानवता धर्म ” हाच आहे. सर्व धर्माचा पाया हा ” समता ” च आहे. असे असताना सर्व धर्माचे लोक मात्र वैदिक धर्माला बळी पडले आहेत, प्रत्येक जण आपापल्या धर्माचे त्याच्या तत्त्वाचे त्याच्या सिद्धांताचे त्याच्या पद्धतीचे अनुकरण न करता साऱ्या धर्माचे लोक फक्त वैदिक धर्माचे अनुकरण करताना त्याचे शिक्षण घेताना दिसत आहेत. याचा अर्थ वैदिक ब्राह्मण धर्माने सर्व धर्मावर मात केली आहे, असेच म्हणावे लागते. 

        असे घडण्याला इतिहासकार सुद्धा कारणीभूत आहेत, इतिहासकारांनी जो इतिहास लिहिला तो राजे रजवाड्यांचा इतिहास हा राज्यविस्तार करण्यासाठी नसून आपला धर्मविस्तार आणि प्रसार करण्यासाठी आहे असे खोटे सांगितले. आणि सर्व धर्मात विषमतेचे बीजे पेरली. याचा अर्थ इतिहासकार हे वैदिक ब्राह्मण धर्माचे फॉलोवर्स दिसतात. म्हणजे संदेश वाघ दिसतात. पण खरी गोष्ट ही की, इतिहासातील राजे मग ते कोणत्या धर्माचे असो, त्यांनी आपल्या धर्माचा विस्तार व्हावा किंवा प्रसार व्हावा म्हणून लढाया केल्या नाहीत तर आपल्या राज्याचा राज्यविस्तार व्हावा म्हणून इतर राज्यावर चालून जायचे त्याची लढाई करून करून त्याच्या भूभागावर कब्जा करायची, त्यांचे सैन्य त्यांचे किल्ले पराजित राजाचा राजवाडा आपल्या ताब्यात घ्यायचे. केवळ आपल्या धर्माच्या राजासोबत लढाई करायची नाही तर इतर धर्माच्या राजासोबत लढाई करायची, असा त्यांचा नियम नव्हता, तर स्व धर्मीय राजासोबत सुद्धा लढाई करून त्याचे राज्य जिंकत होते. म्हणजेच कोणत्याही धर्माचा राजा असो तो ” धर्म ” पाहून लढाई करीत नसे. स्व धर्मीय असो की परधर्मी असो त्याचे राज्य जिंकणेसाठी त्याचे वर चाल करून जाणे, त्याच्याशी लढाई करून त्याचे राज्य जिंकून घेणे आणि आपले राजे विस्तारित करणे हाच उद्देश असायचा, इतिहासातील लढाया पाहिल्या तर राजस्थानातील अनेक हिंदू राजे आपापसात लढून एकमेकाचे राज्य काबीज केल्याचे इतिहासात नमूद आहे. औरंगजेबाने सुद्धा अनेक छोट्या छोट्या मुस्लिम राज्यावर आपल्या अफाट सैन्यबळाच्या उपयोग करून ती जिंकून घेत असे. यावरून असे सिद्ध होते की, इतिहासातील लढाया या धर्मविस्ताराच्या नसून राज्यविस्ताराच्या होत्या. 

         अजून एक वैशिष्ट्य हे की, देशातील जनता मात्र ती अनेक धर्माचे असले तरी सर्वधर्मसमभाव बंधुभाव सहकारी प्रेम सलोखा या तत्त्वानेच वागत असे, नव्हे असेच वागत आले आहे आणि अजूनही असेच वागत आहे. खरे तर भूतकाळ असो की वर्तमानकाळ, जनता ही धर्मासाठी कधीच भांडले नाही आणि भांडत नाही आणि भांडणार पण नाही, कारण धर्माचा संबंध हा देवाशी आहे, धर्म अनेक असले तरी देव मात्र एकच आहे समुद्रासारखा. आणि धर्म हे नद्या सारखे आहेत अनेक असले तरी सर्व नद्या या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. असे हे धर्माचे तत्त्वज्ञान आहे. धर्म म्हणजे देवाकडे घेऊन जाणारी वाट आहे, आणि अनेक धर्माच्या अनेक वाटा ह्या देवासाठी असून शेवटी त्याला जाऊन मिळतात. हीच तर खऱ्या धर्माची शिकवण आहे. ही शिकवण मुस्लिम सुफी संतांची आणि हिंदू वारकरी संतांची असल्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याची भारतीय परंपरा आहे. 

        परंतु सलोखा सहिष्णुता आणि बंधू भावाची ही उज्वल परंपरा धर्मांध अतिरेकी इतिहासकारांनी मुस्लिम राज्य आणि हिंदू राजे यांच्या लढाया म्हणजे राज्यविस्तार करण्यासाठीच्या नसून आपापला धर्मविस्तार करण्यासाठीच्या आहेत असे इतिहासाचे विचित्र चित्रण करून जनसामान्यात धर्म भेदाचे विष पेरले आणि धर्मदेश पसरविला. वर्तमान काळात याचा दुष्परिणाम लोकशाहीवर होत आहे, मत विभागणीवर होत आहे, निवडणुकीवर होत आहे. 

       पूर्वीच्या राज्यांचा जर धार्मिक द्वेषाचा दृष्टिकोन असला असता तर औरंगजेब कडून हिंदू मिर्झाराजे यांनी शिवाजी वर अनेक वेळा चाल करून आले नसते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात पठाण मुस्लिम सैन्यांची फलटण राहिली नसती, त्यांचा वकील मुस्लिम आणि अंगरक्षकही मुस्लिम सैनिक राहिला नसता, त्यावेळी चे राजे धर्मांध असले असते तर अफजलखानाचा अंगरक्षक कुलकर्णी राहिला नसता आणि याने शिवाजी महाराज राज वर हल्ला केला नसता, आणि शिवाजी महाराजांचा जी वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांचा मुस्लिम अंगरक्षकांनी अफजल खानच्या कुलकर्णी अंगरक्षकास ठार केले नसते. शिवरायांच्या सैन्यात सेनादन प्रमुख, तोफखाना प्रमुख मुस्लिम राहिले नसते, मदारी मेहतरणे तर औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या शिवाजीची आग्र्याहून सुटका केली नसती. औरंगजेबच्या दहा लाख सैन्यात नऊ लाख तर हिंदू सैनिकच होते, औरंगजेब हिंदुद्वेष्ट असला असता तर एवढे हिंदू चे लोक सैन्यात भरती केले नसते. शिवाजी महाराज जर मुस्लिम विरोधी असले असते तर ” लढाईत कुराण कोणाचे हाते लागले तर ते सुरक्षितपणे मुस्लिम जनतेला परत करा”, असा आदेश महाराजांनी सैन्याला दिला नसता. शिवाजी महाराज जर मुस्लिम विरोधी असतील तर किल्ल्यावर मुस्लिम सैन्यास नमाज पडण्यासाठी मशिद बांधून दिली नसती. यावरून शिवाजी महाराज म्हणजे फक्त गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत होते आणि अन्य हिंदू किंवा मुस्लिम धर्मे जनतेचे पाठीराखे नव्हते असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे ” सर्वधर्मसमभाव “या विचाराचे होते हेच खरे आहे. 

       शिवराय आणि राणा प्रताप या हिंदू राजांनी मोगल शासकीय विरोधात बराच काळ लढा दिला. अनेक लढाया केल्या पण ह्या लढाया ” धर्म ” या मुद्द्यावरून झाले नाहीत. धर्म हा निकष नव्हता. तर क्षेत्र जिंकणे हा निकष होता किंवा उद्देश होता.एका राजाने दुसऱ्या राज्यावर लढाई करून त्याचे क्षेत्र जिंकून त्याचा ताबा घ्यायचा हा उद्देश लढायचा असायचा ” क्षेत्ररक्षक ” म्हणूनच सर्व राज्यांना म्हणजे राजे मंडळींना राजे घराण्यांना ” क्षत्रिय ” म्हणण्याचा प्रघात वर्णव्यवस्थेत आला. 

     राणा प्रतापच्या सैन्यात दर तीन सैन्यापैकी एक सैनिक मुस्लिम असे, त्याचा प्रमुख सल्लागार त्याच्या मित्राचे नाव हकीम खान होते. राणा प्रताप आणि अकबर यांच्यात जी प्रदीर्घ लढाई झाली ती एका विशिष्ट ” स्थान पद” यासाठी. जे स्थान अकबराच्या ताब्यात होते ते राणा सिंहाला अकबर देत नव्हता, तो दरिया अकबरने शेवटपर्यंत दिला नाही. परंतु दोघांच्याही मरणोत्तर अकबराचा मुलगा जहांगीर याने राणा प्रताप सिंह चा मुलगा अमरसिंग यास तो दर्जा दिला त्यामुळे हा लढा थांबला. 

    शिवराय आणि राणा प्रताप या वरील दोन उदाहरणावरून असे दिसते की, सैनिक आणि प्रजा यांचे धर्म भिन्न भिन्न असले तरी, ” धर्म नव्हे राजनिष्ठा ” हीच मध्येयुगीन सरंजामी काळात मुख्य प्रेरणा होती, राज्यविस्तार हेच लढाई करण्याचे कारण होते, धर्मप्रसार करणे हे राजे लोकांचे ध्येय नव्हते, परंतु धर्मांध इतिहासकारांनी ” धर्माला ” केंद्रस्थानी ठेवून इतिहास लिहिला, ठरवून केलेली ही त्यांची चूक होय. अशा चुकीच्या इतिहासाचे त्यांना जे अपेक्षित परिणाम हवे होते ते झाले. धर्मवादी इतिहास मुलांना शिकविला गेला आणि धर्मवादी कथा कीर्तने जनतेला सांगून शेवटी धर्मवादी सरकार सत्तेत आले. 

      अकराव्या शतकातील महान कवी कलहन याने आपल्या “राज तरंगिनी ” या पुस्तकात लिहिले आहे की, तत्कालीन काश्मीरचा राजा हर्षदेव याने आसपासची मंदिरे देवळे पाडून तेथील जड जेव्हाही सोने मूर्ती इत्यादी अमूल्य चीज वस्तू लुटून आणले आणि आणायचा. याचा अर्थ हिंदू राजा सुद्धा संपत्ती मिळवण्यासाठी हिंदूंची देवळे पाडायचा. गोवळकोंडा चा मुस्लिम राजा नवाब याने सलग तीन वर्षे खंडणी भरली नाही म्हणून त्याची मस्जिद पाडून तेथे दडपून ठेवलेली संपत्ती औरंगजेबाने जप्त केली. हे दोन्ही राजे मुस्लिम असूनही धर्म या गोष्टीचा विचार न करता आपला कर वसूल करण्यासाठी किंवा खंडणी वसूल करण्यासाठी मज्जित सुद्धा पाडीत होते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दक्षिणेत टिपू सुलतान विरोधी मराठा सैन्याने टिपूला चिडवण्यासाठी श्रीरंगपट्टण येथील भव्य मंदिर उद्ध्वस्त केले पण ते पुणे आपल्या दुःखी हिंदू प्रजेच्या भावनांचा आदर करीत ते मंदिर होते तसे बांधून दिले, याचा अर्थ त्यावेळी चे राजे हे धर्मापेक्षाही आपले क्षेत्र आणि आपली प्रजा यांचे हित जोपासत होते. मोहम्मद गजनी सोमनाथ मंदिर पाडून तेथील सोने जडजेवाहीर संपत्ती लुटण्यासाठी गेला असता तेथील मुस्लिम राजा अब्दुल फत दावत याने मोहम्मद गजनीश मदत न करता उलट विरोध केला म्हणून त्याने दाऊद मशिद पाडली. गजनी हा दावतला हरवून ठाणेश्वर येथे आला. तेथील हिंदुराजा आनंदपाल यांनी गजनीला मदत केली कारण हा दाऊद राजाचा विरोधक होता. गजनीच्या सैन्यात एक तृतीयांश सैनिक हिंदू होते तर बारा सेनापती पैकी पाच हिंदू होते, सोमनाथ मंदिर पाडण्यात आणि तेथील संपत्ती लुटून राजाला देणारे राजाचे हिंदू सैनिकच होते. याचा अर्थ सैन्याची निष्ठा धर्म नव्हता तर राजनिष्ठा होती, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

       असे असताना इतिहासकारांनी सत्ते लपवून धर्माला पुढे करून सामान्य जनतेत धर्मावरून हिंदू मुस्लिम ऐक्यात उभी फूट पाडली. स्वातंत्र्य लढ्यात हिंदू-मुस्लीमांचे ऐक्य हे लक्षणीय आहे. हे पण विसरून चालणार नाही. अर्थात इंग्रजांच्या ताब्यात असलेला भारत देश हा हिंदू मुस्लिम ऐक्यानी जिंकला, हे सत्य टाळता येणे शक्य नाही. 

      लेखक : दत्ता तुमवाड

       सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 30 ऑगस्ट 2025. फोन : 94 20 91 22 09.