ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील चतुर्वेदी यांनी हॉकी खेळाचे जादूगर व महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या खेळाच्या क्षेत्रातील योगदाना विषयी माहिती सांगून खेळांचे महत्व सांगितले. खेळ आपल्या जीवनातील अभिन्न अंग आहे. आपल्या आरोग्य सोबतच शारीरिक, मानसिक, सामाजिक चारित्रिक विकास साधला जातो. आपल्याला आपल्या क्षमतेनुसार विविध खेळांमध्ये अवश्य सहभाग घेतला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.जितेंद्र कुमार ठाकुर यांनी सांगितले की खेळामुळे शारीरिक शक्ती वाढून आपले आरोग्य निरोगी राहते. यामुळे विज्ञान, मनोविज्ञान, संगठन, अनुशासन आणि नैतिकता याविषयी महत्त्वपूर्ण शिक्षण प्रदान करते. तसेच खेळामुळे आपला सर्वांगीण विकास होतो. खेळांच्या माध्यमातून आपल्या अंगी सांघिकभाव, मानवता, बंधुत्व, नेतृत्वक्षमता, अधिक कष्ट करण्याची क्षमता, दृढता हे गुण भिनल्या जातात. सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार विविध खेळांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.
याप्रसंगी महाविद्यालयामध्ये रनिंग, गोळा फेक, भालाफेक अश्या विविध प्रतियोगितांचे आयोजन करण्यात आले. या प्रतियोगितांमध्ये विजयी खेळाडू मानसी शिवणकर, जानवी, मयूर, अर्पित जगसानी, शुभम वाघमारे यांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित केल्या गेले. प्रा. नीरज अतकरी यांनी आपल्या संबोधनात सांगितले की मेजर ध्यानच्या भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक होते. त्यांच्या प्रतिभा आणि समर्पणातून आपल्याला हे शिकायला मिळते की खरा खेळाडू तोच असतो जो खेळ भावनेला प्रथम स्थानावर ठेवू शकतो.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.राजश्री व आभार प्रदर्शन श्री पुकराज लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील डॉ.सुनील कापगते, डॉ.सुनील अकोलनेरकर, प्रा.अजय कांबळे, डॉ.संदीप भगत, प्रा.राकेश शेजवाल, अशोक मीना, शाहिद सय्यद, रवींद्र मुंगुलमारे व रश्मी टिकेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहयोग केला.



