Home सांस्कृतिक आळंदीत जय गणेश ग्रुपच्या गणेशोत्सवात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ठरतंय आकर्षण….

आळंदीत जय गणेश ग्रुपच्या गणेशोत्सवात महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ठरतंय आकर्षण….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील जय गणेश ग्रुप यांच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवात उभारण्यात आलेल्या भव्य देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मंडळाने यंदा रौप्य महोत्सवी निमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा अप्रतिम देखावा साकारला असून, तो भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे.

       सजीवसदृश्य शिल्पकला, सुंदर विद्युत रोषणाई, आकर्षक रंगसंगती व पार्श्वभूमीला दिलेले धार्मिक संगीत यामुळे हा देखावा अवघ्या आळंदीकरांसह येथील भाविकांसाठी भक्तिमय अनुभव देतो आहे. महाकालेश्वर मंदिराचे गाभारा, शिखर, प्रवेशद्वार आणि परिसर अगदी हुबेहूब उभारण्यात आला असून, मंदिराच्या मूळ रचनेची अचूकता पाहून नागरिक आश्चर्यचकित होत आहेत.

       जय गणेश ग्रुपचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून हा देखावा उभारण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मेहनत घेतली. स्थानिक कारागीर, रंगकाम करणारे तसेच मंडळातील तरुणांनी उत्साहाने काम करत भव्य दालन साकारले आहे. दरम्यान, या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असून, गणेशभक्तांसाठी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचे दर्शन आळंदीतच होत असल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.