Home क्रीडा विरागने फ्युचर पोदार शाळेची यशाची परंपरा कायम ठेवत पटकावला प्रथम क्रमांक….

विरागने फ्युचर पोदार शाळेची यशाची परंपरा कायम ठेवत पटकावला प्रथम क्रमांक….

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा आणि तालुका क्रीडा संकुल समिती साकोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये फ्युचर पोदार लर्न स्कूलच्या विराग नंदकुमार गेडाम या विद्यार्थ्याने यशाची परंपरा कायम ठेवत विजेते पदावर नाव कोरले.

बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धेत या विरागने शाळेचे प्रतिनिधित्व केले होते.

        १४ वर्षा खालील मुले या वयोगट मध्ये विरागने सुरुवातीपासूनच खेळावर प्रभुत्व ठेवले होते. प्रतिस्पर्ध्याला नमवित विरागने आपल्या लौकिकानुसार आपला नैसर्गिक खेळ केला. अखेर ५ फेऱ्यांच्या सामन्यात ४ – १ ची विजयी आघाडी घेत विरागने विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम क्रमांकमिळवत विरागने शाळेची यशाची परंपरा कायम ठेवली. त्याची निवड जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी झाली.

         शाळेचे संचालिका सौ. नमिता तुमसरे, प्राचार्या निकेशन देऊरमल्ले यांनी विरागचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रिडाशिक्षक नितीन पोटफोडे यांना सुध्दा गौरविण्यात आले.