Home Social पं.स.कृषी अधिकारी चंद्रकांत देशमुख यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न… — पारशिवनी पंचायत...

पं.स.कृषी अधिकारी चंद्रकांत देशमुख यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न… — पारशिवनी पंचायत समितीच्या सभागृहात कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन. — चंद्रकांत देशमुख यांचा साहपत्नीक गौरव.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

  पारशिवनी:- पारशिवनी पंचायत समितीच्या सभागृहात कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

       ठराविक वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले चंद्रकांत देशमुख कृषी अधिकारी पंचायत समिती पारशिवनी यांचा पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात साहपत्नीक सत्कार करण्यात आला.

     गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी कृषी अधिकारी चंद्रकांत देशमुख यांचा साहपत्नीक शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह व भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

      यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी नैतामे. संवर्धन अधिकारी भदाने. बाळासाहेब बाळापूरे,विनोद घारड,सावरकर,चरडे,अभियंता जितेंद्र अनकर,पाटील,काळे, वाघ व पत्रकार गोपाल कडू, ईश्वर खंगार सह कर्मचारी उपस्थित होते.

    यावेळी कृषी विभाग,शिक्षण विभाग,बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,घरकुल विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

      तर कृषी निविष्ठा पुरवठादार दुकानदारांच्या वतिने गौरव करण्यात आला.ग्रामसेवक संघटनेचे मुन व बोंदाडे,यांनी देशमुख यांचा सहपत्नीक गौरव केला.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कोंडापे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पारशिवनी यांनी प्रभावीपणे केले.

     सत्कारमूर्ती चंद्रकांत देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वाचे आभार मानले.कार्यक्रमाचे आभार मुनेश दुपारे यांनी मानले.